आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेनंतर आता सिगारेटच्या किंमती वाढणार; आरोग्य मंत्र्यांची शिफारस मान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात सिगारेट ओढणार्‍यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तरुणाई मोठ्या संख्येने सिगारेटच्या आहारी गेली आहे. सिगारेटची लत सुटावी, यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सिगारेटच्या किंमती साडे तीन रुपयांनी वाढ करण्‍याची शिफारस केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. विशेष म्हणजे अर्थखात्याने डॉ: हर्षवर्धन यांची शिफारस मान्य केली आहे. त्यामुळे धुम्रपान करणार्‍यांच्या खिशाला आता आणखी चाप बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तंबाकूजन्य पदार्थावरील कर वाढवल्याने धुम्रपान करणार्‍यांना परावृत्त करता येऊ शकेल, असा दावा डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. याशिवाय वीडीबाबत देण्यात आलेली कर सवलतही मागे घेण्याची विनंती करण्‍यात आली आहे.

देशातील जवळपास 20 लाख वीडी कंपन्यांना करात सुट देण्यात आली आहे. कर प्रणालीत बदल करण्याबाबतही विनंती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार येत्या 11 जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 जुलैला सुरु होणार असून 25 ऑगस्टला समाप्त होणार आहे.