आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increasing The Production Expenditure Micra ,avilia Suni Aut Price Hike

वाढत्या उत्पादन खर्चामुळे मायक्रा, एव्हालिया सनी कार महागल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - विक्रीमध्ये चांगली वाढ होऊनदेखील मोटार कंपन्या सध्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्रस्त झाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून निस्सान इंडियाने आपल्या मायक्रा, सनी आणि एव्हालिया या तीन मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्या.

कंपनीच्या नवीन निर्णयानुसार मायक्रा हॅचबॅकची किंमत 1.5 टक्क्यांनी, सेडान सनीची किंमत 2 टक्क्यांनी, तर एव्हालियाची किंमत 2.5 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. या सर्व मोटारींची किंमतवाढ 1 फेब्रुवारीपासून अमलात आली आहे. मोटारींच्या किमतीतील वाढ गेल्या काही महिन्यांपासून रोखून ठेवण्यात आली होती; परंतु आता केलेल्या किंमतवाढीमुळे उत्पादन खर्चाचा भार थोडाफार कमी होऊ शकेल तसेच चलन विनिमय दरातील चढ - उताराचा विपरीत परिणाम कमी होऊ शकेल, असे मत हॉवर ऑटोमोटिव्ह इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक नितीश टिपणीस यांनी व्यक्त केले.