आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Index Of Industrial Production (IIP) Growth News In Marathi

औद्योगिक उत्पादनात वाढ; तीन महिन्यांनंतर प्रथमच सकारात्मक कल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सलग तीन महिने नकारात्मक पातळीवर असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) जानेवारीत प्रथमच 0.1 टक्क्यांनी वाढला. ऊर्जा निर्मिती आणि खाण क्षेत्राने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे आयआयपीमध्ये वाढ दिसून आली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मात्र घसरण झाली.

चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी या 10 महिन्यांच्या काळात औद्योगिक उत्पादन स्थिर राहिले. मागील वर्षी याच काळात या निर्देशांकाने एक टक्का वाढ नोंदवली होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. जानेवारीमध्ये वीज निर्मितीत 6.5 टक्के वाढ झाली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 14 टक्के वाटा असणार्‍या खाण क्षेत्रात 0.7 टक्के वाढ झाली. डिसेंबरमध्ये खाण क्षेत्र नकारात्मक पातळीत होते. एप्रिल 2013 ते जानेवारी 2014 या काळात वीजनिर्मितीत 5.7 टक्के, तर खाण क्षेत्रात नकारात्मक (वजा) 1.5 टक्के वाढ झाली.

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात 75 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असणार्‍या मॅन्युफॅक्चर क्षेत्राने केलेल्या खराब कामगिरीचा फटका आयआयपीला बसला. जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 0.7 टक्के घसरण झाली. जानेवारी 2013 मध्ये या क्षेत्रात 2.7 टक्के वाढ झाली होती.