आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mukesh Tops Hurun's Rich India List With Rs 1.2 L Cr Wealth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्जाधीशांत ब्रिटन-रशियापेक्षा भारतीय पुढे, २,०८९ अब्जाधीशांत ९७ भारतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात भारताचे नाव पुन्हा जगभरात गाजत आहे. या वेळी कारण आहे अब्जाधीशांची संख्या. अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारत टॉप-३ देशांत पोहोचला आहे. भारतात एकूण ९७ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षी ७० होते. भारताने ज्या दोन देशांना मागे सारले ते दोन कारणांनी अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला देश आहे ब्रिटन, ज्याचा भारत दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ गुलाम होता. दुसरा रशिया, जे दीर्घ काळापासून भारताचे मित्रराष्ट्र आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट- २०१५ नुसार अमेरिकेत सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे. यादीत भारत गेल्या वर्षी पाचव्या स्थानी होता. जगभरात एकूण २,०८९ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षभरात अब्जाधीशांचा आकडा २२२ ने वाढला आहे. तथापि, त्यांची एकूण संपत्ती १.५ टक्क्यांनी घटून ६.७ लाख कोटी डॉलर्स (४०२ लाख कोटी रु.) झाली आहे.
केवळ एका वर्षात ब्रिटन- रशियाला मागे टाकले

भारतानेगेल्या वर्षात ब्रिटन, रशियाला मागे टाकले. भारतीय बाजार २०१४ मध्ये ३० टक्क्यांनी वाढले. यामुळे उद्योगपतींच्या संपत्तीचे मूल्य वाढले. दुसरे म्हणजे, रशिया इंग्लंडमधील आर्थिक सुस्ती. रशियातील बहुतांश अब्जाधीश तेल गॅसचे व्यावसायिक आहेत. वर्षभरात तेलाच्या किमती अर्ध्यावर आल्या. रशियन चलन रुबल कमकुवत झाले. त्यांच्या मालमत्तेचे मूल्य सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे.

स्वकमाईने ५६ जण अब्जाधीश
४१ भारतीय वारशाने,तर ५६ जण स्वबळावर अब्जाधीश झाले. भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती १५.९६ लाख कोटी रु. आहे. सहा हजार कोटी रुपये वैयक्तिक संपत्ती असलेल्यांना या यादीत अब्जाधीश संबोधण्यात आले आहे.

भारतातील सर्वांत श्रीमंत
- मुकेश अंबानी 1.2 लाख कोटी रु.
- पेलोनजी मिस्त्री 96
- अझीम प्रेमजी 84
- शिव नाडर 66
- केएम बिर्ला 60
- दिलीप संघवी 1.02 लाख कोटी रु.
- सुनील मित्तल 60
- बर्मन परिवार 34.8
- उदय कोटक 32.4
- गौतम अदानी 28.8

सर्वात श्रीमंत भारतीय महिला
- सावित्री जिंदल 16.2
- इंदू जैन 15.0
- अनु आगा 8.4
- एम. श्रीनिवासन 7.8
- किरण मुजुमदार 6.0
आकडे हजार कोटी रुपयांत