Home | Business | Industries | india, gdp looking down fall, business

पायाभूत क्षेत्राची वाढ मंदावली...

agency | Update - Jun 02, 2011, 11:16 AM IST

सिमेंट उत्पादनात झालेली घसरण आणि तयार पोलादाचे कमी झालेले उत्पादन याचा परिणाम म्हणून सहा प्रमुख उद्योगांची वाढ मंदावली आहे. एप्रिल महिन्यात या सहा उद्योगांनी ५.२ टक्के वाढीची नोंद केली आहे.

  • india, gdp looking down fall, business

    dev_258सिमेंट उत्पादनात झालेली घसरण आणि तयार पोलादाचे कमी झालेले उत्पादन याचा परिणाम म्हणून सहा प्रमुख उद्योगांची वाढ मंदावली आहे. एप्रिल महिन्यात या सहा उद्योगांनी ५.२ टक्के वाढीची नोंद केली आहे.मार्च महिन्यात या उद्योगांनी ७.४ टक्के वाढीची नोंद केली होती आणि त्यानंतर या उद्योगांची घसरण सुरू झाली. २0१0-११ या वर्षात या उद्योगांनी ५.९ टक्के, तर त्याअगोदरच्या वर्षात या उद्योगांनी ५.५ टक्के वाढीची नोंद केली होती. कच्चे तेल, पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने, कोळसा, विद्युत, सिमेंट आणि तयार पोलाद या उद्योगांमध्ये वर्षभरात ७.५ टक्के वाढीची नोंद झाली असल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.गेल्या वर्षातल्या एप्रिल महिन्यात सिमेंट उद्योगाने ८.८ टक्के वाढीची नोंद केली होती; परंतु यंदाच्या वर्षात याच महिन्यात सिमेंट उत्पादन १.१ टक्क्यांनी घटले आहे. कोळसा उद्योगाने उत्पादनातील घसरण भरून काढली आहे.Trending