बंगळुरू - भारतात स्मार्टफोन वापरणार्यांच्या संख्येत मागील एक वर्षात गतीने वाढ झाली आहे. स्मार्टफोनच्या विक्रीबाबत भारताने चीनवर आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) अहवालानुसार भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील बाजारपेठेत स्मार्टफोनच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 186 टक्के वाढ झाली आहे, तर चीनमध्ये 2014 च्या पहिल्या तिमाहीत ही वाढ केवळ 31 टक्के आहे.
अहवालानुसार भारतात सध्या स्मार्टफोन बाजार दहा टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, यात गतीने वाढ होण्याची शक्यता असून आता कमी किमतीच्या हँडसेटवर भर आहे.