आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Inc Promises 10 Lakh New Jobs, Up To 40% Hike In 2015

नोकर्‍यांसाठी २०१५'अच्छे' वर्ष, ४० टक्के वेतनवाढीची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१५.. नव्या नोकर्‍यांसाठी अच्छे वर्ष ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी १० लाख नवीन नोकर्‍या उपलब्ध होणार तर आहेतच, पण सध्या नोकरीत असलेल्यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ४० टक्के पगारवाढीची भेटही मिळण्याचा अंदाज आहे.

सरासरी वेतनवाढ यंदा कमाल पातळीवर १५ ते २० टक्क्यांच्या दरम्यान राहणार असून सरसकट सर्व विविध क्षेत्रांमध्ये ती गेल्या वर्षांत १० ते १२ टक्के हाेती. सध्या बहरत असलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रात तुलनेने जास्त पगारवाढ होण्याचा अंदाज आहे.

अलीकडच्या काही वर्षांत पाच टक्क्यांच्या खाली विकासदर राहिल्यानंतर आता तो साडेपाच टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता असून विविध क्षेत्रांतील व्यावसायिक वातावरणही सुधारणार आहे. त्यामुळे नोकरीच्या बाजारपेठेत तुफान तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जागतिक पातळीवरील अनेक मान्यवर कंपन्या भारतात दुकाने थाटण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे वरिष्ठ तसेच अन्य पातळीवरही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीच्या संधी वाढणार आहेत.
आयटी क्षेत्र संधीत आघाडीवर

मायहायरिंगक्लब.कॉम या नोकरी देणार्‍या संकेतस्थळाने केलेल्या एका नव्या सर्वेक्षणानुसार नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नवीन वर्ष सकारात्मक ठरणार असून आयटी, आयटीईएस, एफएमसीजी याबरोबर अन्य विविध क्षेत्रांमध्ये ९.५ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा नव्या उमेदवारांना विशेषकरून यंदा रोजगाराच्या संधी असून त्या ई-कॉमस, बँकिंग, वित्त, आयटी, आयटीईएस आणि रिटेल या क्षेत्रांमध्ये त्या प्रकर्षाने दिसून येतील, असे कंपनीचे सीईओ राजेश कुमार यांनी सांगितले.

वेतनातही चांगली वाढ
मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही क्षेत्रांमध्ये सरासरी एक अंकी कमाल पगारवाढ होण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणार्‍यांच्या वेतनात २० ते ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अस्पोयरिंग माइंडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू अगरवाल यांनी सांगितले की, अत्यंत प्रतिभावान कर्मचार्‍यांच्या वेतनात २० ते ४० टक्के वाढ अपेक्षित आहे. कारण कुशल मनुष्यबळाची मागणी जास्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे ग्रुप आणि एऑन हेविट या व्यवस्थापन सल्ला कंपन्यांच्या मते सरासरी १० ते १८ टक्क्यांनी वेतनवाढ या वर्षात होण्याचा अंदाज आहे.