आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Inc To Offer 10.3 Pct Salary Hike To Employees This Fiscal News In Divya Marathi

यंदा भारतीय कंपन्यांकडून 10 % वेतनवाढ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय कंपन्या या वित्तवर्षात आपल्या कर्मचार्‍यांच्या वेतनात सरासरी 10.3 टक्के वाढ करणार आहे. फार्मा, आरोग्य सेवा व जैविक विज्ञानसारख्या क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सरासरी 12.4 टक्के वेतनवाढ मिळणार आहे.

डेलॉइटच्या सर्व्हेक्षणात याबाबत माहिती देण्यात आली आहे. डेलॉइटने सांगितले की, आर्थिक विकासातील सुस्ती व कर्मचार्‍यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण घटल्याच्या पार्श्वभूमीवर सरासरी 10.3 टक्केपगारवाढीची आशा आहे. तथापि, ते गेल्या वित्तवर्षातील 10.6 पगारवाढीच्या तुलनेत केवळ 0.3 टक्क्यांनी कमीच आहे.

फार्मा क्षेत्रात 12.4 टक्के
2014-15 वित्तवर्षादरम्यान फार्मा, आरोग्य सेवा व लाइफ सायन्सेजसारख्या क्षेत्रात कर्मचार्‍यांच्या पगारात सरासरी 12.4 टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते. मात्र ही अंदाजे वाढ गेल्या वित्तवर्षातील 12.6 टक्क्यांच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी कमीच राहणार आहे.