आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Inc's Revenue Likely To Grow 9 11% In June quarter: Crisil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपन्यांना चांगले दिवस; पहिल्या तिमाहीत कंपन्यांच्या कमाईत 11 % वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय कंपनी जगताच्या कमाईत 9 ते 11 टक्के वाढ होई शकते, असा अंदाज पतमानांकन करणार्‍या क्रिसिल या संस्थेने वर्तवला आहे. क्रिसिलच्या मते, 2014-15 या संपूर्ण अर्थवर्षात कंपन्यांच्या महसुलात 11 ते 12 टक्क्यांनी वाढ होईल. मार्च 2014 अखेर संपलेल्या तिमाहीत महसूल 8.4 टक्के आणि जून 2013 तिमाहीत यात 4.3 टक्के वाढ झाली होती.

क्रिसिलच्या मते, निर्यात आणि देशातील खपाशी निगडित काही क्षेत्रांची या तिमाहीत चांगली कामगिरी दिसून येईल. क्रिसिलच्या अभ्यासात वित्तीय सेवा तसेच तेल कंपन्या वगळता 600 कंपन्यांचा समावेश होता. क्रिसिलच्या मते, रखडलेल्या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणे आणि जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारल्याने कंपन्यांच्या उत्पन्नावर दीर्घकालीन परिणाम होईल. मात्र घटत्या मान्सूनने पर्जन्यमान कमी होण्याच्या अंदाजाने चिंतेत भर पडली आहे. विशेषत: ज्या क्षेत्राच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा ग्रामीण भागाशी निगडित आहे, अशा कंपन्यांना पावसाची चिंता सतावते आहे.

ही क्षेत्रे चमकणार
क्रिसिल रिसर्चचे अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या मते, आयटी सर्व्हिसेस, फार्मास्युटिकल्स आणि रेडिमेड गारमेंट यासारख्या निर्यातीशी निगडित क्षेत्राच्या पहिल्या तिमाहीतील महसुलात 16 ते 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांच्या विदेशातील कारभारात सुधारणा दिसून येईल. दुचाकी वाहन निर्मिती, स्टील, वीज, एफएमसीजी आणि जहाज बांदणी या क्षेत्राची कामगिरी चमकदार होण्याची शक्यता आहे.

यांची कामगिरी घसरण्याची शक्यता
क्रिसिल रिसर्चच्या मते, कन्स्ट्रक्शन, कॅपिटल गुड्स आणि सिमेंट यासारख्या पायाभूत आणि गुंतवणुकीशी निगडित क्षेत्रांची कामगिरी खालावण्याची शक्यता आहे. कारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत आणखी वेग आलेला नाही. चीनकडून मागणी घटल्याने कापूस स्विनिंग कारखान्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. तसेच विक्रीची गती मंदावल्याने रिअ‍ॅल्टी डेव्हलपर्सच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

क्रिसिलचा अंदाज
- आयटी, फार्मा आणि रेडिमेड कपडे क्षेत्राच्या महसुलात 16 ते 20 टक्के वाढीची शक्यता.
- मोटारसायकल, स्टील, वीज, एफएमसीजी आणि शिपिंग क्षेत्र करणार चांगली कामगिरी.
- बांधकाम, भांडवली वस्तू, रिअ‍ॅल्टी आणि सिमेंट यांच्या महसुलात फारशा वाढीची चिन्हे नाहीत.