आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैमध्ये कार विक्रीची गाडी सुसाट; मारुती, ह्युंदाई, होंडाच्या विक्रीत वाढ, महिंद्राला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक महिन्यांपासून वाहन बाजारात असलेली मरगळ पुन्हा एकदा झटकली गेली आहे. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, होंडा आणि टोयोटा या कंपन्यांनी जुलै महिन्यात चांगली वाढ नोंदवून वाहन बाजारपेठेला पुन्हा संजीवनी मिळू लागल्याचे संकेत दिले आहेत.
मोटार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीमध्ये 19.9 टक्क्यांनी वाढ होऊन ती गेल्या वर्षातल्या जुलै महिन्यातील 75,145 मोटारींवरून यंदाच्या वर्षात याच कालावधीत 90,093 मोटारींवर गेली आहे. स्विफ्ट, एस्टिलो, रिट्झ या छोटेखानी मोटारींना चांगली मागणी आली आहे. या मोटारींच्या विक्रीत प्रामुख्याने 81.2 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली असून ती 13,882 मोटारींवरून 25,156 मोटारींवर गेली आहे. सेडान गटातील डिझायरच्या विक्रीत 22.2 टक्क्यांनी वाढ होऊन ती 15,249 मोटारींवरून 18,634 मोटारींवर गेली आहे. मारुतीची प्रतिस्पर्धी असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या विक्रीमध्ये 12.69 टक्क्यांनी वाढ होऊन ती 25,965 मोटारींवर गेली आहे. होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या विक्रीतही 39.97 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीची मोटार विक्री गेल्या वर्षातल्या 11,223 मोटारींच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात 15,709 मोटारींवर गेली आहे. ह्युंदाई मोटरच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव म्हणाले की, आर्थिक पातळीवर स्थिरता येत असून त्याचे संकेत दिसू लागले आहेत. होंडा कार्सच्या विकी आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी होंडा मोबिलिनो बाजारात येताच झालेल्या 10 हजार बुकिंगमुळे चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट केले.
कंपनी जुलै 2014 जुलै 2013 वाढ/घट
फोर्ड इंडिया 7867 7592 3.49 %
जनरल मोटर्स 6503 4726 - 27.32 %
महिंद्रा अँड महिंद्रा 34,490 33,047 - 4.18 %