आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपवरून धडा घ्या, चांगले आर्थिक व्यवस्थापन करा- मुखर्जी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- युरोप देशांतील युरोझोनच्या वित्तीय संकटापासून धडा घेत सध्या आपल्यालाही अत्यंत विचारपूर्वक आणि चांगले आर्थिक धोरण आखण्याची गरज आहे, असे मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, युरोपातील काही देशांचे कर्ज सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा (जीडीपी) 100 टक्के अधिक आहे. चुकीच्या आर्थिक धोरणाचे हे द्योतक आहे. यापासून धडा घेत आपणही विचारपूर्वक आर्थिक व्यवस्थापन केले पाहिजे. आर्थिक तूट एका विशिष्ट मर्यादित राहील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आपल्या देशाला आता कर्ज आणि जमा या बाजूंकडे डोळ्यात तेल घालून पाळत ठेवण्याची गरज आहे. आपली आर्थिक तूट, सार्वजनिक कर्ज हे नियंत्रण पातळीत राहिल याचेही भान ठेवावे लागणार आहे. करदात्यांना चांगली सेवा देत महसूलात वाढ करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. वसुली पद्धतीत अधिक पारदर्शकतेवर सरकारने भर दिला आहे.