आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया प्राइड अवॉर्ड्स विजेत्यांची पुढील सोमवारी घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाच्या इंडिया प्राइड अवॉर्ड्स 2012-13 च्या घोषणेची तारीख जवळ आली आहे. पुढच्या सोमवारी, 28 जानेवारी रोजी नवी दिल्लीत आयोजित एका भव्य सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतील व त्यांचा सत्कार केला जाईल. या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करण्याकरिता देशाचे माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली एक ज्युरी स्थापन करण्यात आली होती.

देशाचा विकास तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) महत्त्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दैनिक भास्कर समूहाने 2009 पासून इंडिया प्राइड पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. यंदा पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यंदा कंझ्युमर इंडस्ट्री, अर्थविषयक सेवा, ऊर्जा आणि वीज, अवजड उद्योग, धातू आणि खनिजे, तेल आणि वायू, वाहतूक आणि पायाभूत सुविधा विकासासह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या 13 श्रेणींमध्ये पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. राज्य पातळीवरील सार्वजनिक उपक्रमांमध्ये ऊर्जा, कृषी, पायाभूत सुविधा विकास, पाणी आणि आरोग्यासह सात श्रेणीत अर्ज मागवण्यात आले होते. या वर्षी पुरस्कारांमध्ये केंद्रीय तसेच राज्यपातळी अशा दोन्ही वर्गात सार्वजनिक उपक्रमांसाठी कार्यरत अ‍ॅड एजन्सीची एकेक श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे. पीएसयूची भूमिका योग्य पद्धतीने सादर करणा-या जाहिरात एजन्सीला पुरस्कार प्रदान केला जाईल. या सर्वच श्रेणींमधून 100 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणा-या एका व्यक्तिमत्त्वाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग (एमपीओ) क्षेत्रातील ‘व्हिटल सी मार्केटिंग लिमिटेड’ ही कंपनी इंडिया प्राइड पुरस्कार 2012-13 ची टायटल स्पॉन्सर कंपनी आहे. त्यासोबतच ‘सु-कॅम प्रिन्सिपल’ ही कंपनी असोसिएट स्पॉन्सर तर ‘न्यू हॉलंड’ को स्पॉन्सर कंपनी आहे.

ज्यूरी सदस्यांमध्ये देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी कोळसा सचिव आलोक परती, डीएव्हीपीचे महासंचालक फ्रँक नरोन्हा, ओएनजीसीचे माजी सीएमडी आर. एस. शर्मा, युनियन बँकेचे माजी सीएमडी आणि सिबिल चेअरमन एम. व्ही.नायर, आयबीएम इंडियाचे कंट्री मॅनेजर हिमांशू गोयल, ईएडीएसचे संचालक मुनीष भार्गव, आयसीआरएचे वरिष्ठ समूह उपाध्यक्ष एल. शिवकुमार, दैनिक भास्कर समूहाचे चीफ कॉर्पोरेट सेल्स अँड मार्केटिंग ऑ फिसर प्रदीप द्विवेदी आणि दैनिक भास्कर समूहाचे उपाध्यक्ष (ब्रँड) संजीव कोटनाला यांचा समावेश आहे.