आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावोस परिषदेत इंडिया शायनिंग,दिग्गज गुंतवणूकदारांनी व्यक्त केली सकारात्मक मते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दावोस - जागतिक आर्थिक परिषदेत भारताबाबत जगातील मान्यवर तसेच कंपन्यांनी चांगले मत व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून आगामी काळात चांगला विकास होण्याची शक्यता पेप्सिको, वॉलमार्ट, सॅबमिलर, अ‍ॅक्सेनच्युअर आदी कंपन्यांनी व्यक्त करतानाच भारतात गुंतवणुकीबाबत अनुकूलता दर्शवत इंडिया शायनिंग असल्याचे म्हटले आहे.
वॉलमार्ट सज्ज, पण...
रिटेलची देशातील वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन अमेरिकेतील वॉलमार्ट घाऊक किरकोळ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु मल्टी ब्रॅँड रिटेल व्यवसायात प्रवेशाच्या नियमांबाबत अधिक स्पष्टता अमेरिकेतील या बड्या कंपनीला हवी आहे. सध्याच्या घडीला कॅश अ‍ॅँड कॅरी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले असून देशातील किरकोळ व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी असून त्यासाठी कंपनीचा दीर्घकालीन दृष्टिकोन असल्याचे वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार डूग मॅकमिलन यांनी सांगितले. आमच्या व्यवसाय पद्धतीचा अवलंब करून दुकानदार, किराणा आणि शेतक-यांना सेवा देणे कायम ठेवतानाच भारतातील आमचा व्यवसाय वाढवू असेही ते म्हणाले. भारतात व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने वॉलमार्ट इंडिया नावाने नोंदणी करण्यात आली आहे. थेट गुंतवणुकीशी निगडित नियमांबाबत सरकार व जनता काय निर्णय घेते यावर वॉलमार्टचा प्रवेश अवलंबून आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी मल्टी ब्रॅँड रिटेलमधील प्रवेशाचा नेमका कालावधी सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात भारती समूहाबरोबर काडीमोड घेतल्यानंतर वॉलमार्ट मल्टी ब्रॅँड रिटेलमध्ये प्रवेश करण्याअगोदर एफडीआय धोरणांच्या यशापयशाचा अभ्यास करीत आहे, असेही मॅकमिलन म्हणाले.
ब्रिक्स अर्थव्यवस्थांना पुन्हा उभारी
दावोस २ ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्स’ अर्थव्यवस्थांना जागतिक आर्थिक पेचप्रसंगाचा फटका बसला होता, परंतु या अर्थव्यवस्थांना आता पुन्हा उभारी येत असून पुढील तीन वर्षांमध्ये भारत स्थिर आर्थिक वृद्धीची नोंद करण्याची शक्यता जागतिक आर्थिक परिषदेत व्यक्त करण्यात आली. अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, जागतिक वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन आर्थिक वाढ मंदावली आणि त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. यंदाच्या वर्षात विकासदर सहा टक्के, 2015 मध्ये सात टक्के आणि 2016मध्ये तो आठ टक्क्यांवर जाईल.
भारताची गुंतवणूक अभिमानास्पद : कॅमेरॉन
भारतीय गुंतवणूक हीच जॅग्वार लॅँड रोव्हरची खरी यशोगाथा असल्याचे अभिमानपूर्वक सांगताना ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी ब्रिटन गुंतवणुकीचे एक आकर्षक ठिकाण बनत आहे. चीनने आमच्या देशात केलेली गुंतवणूक महत्त्वपूर्ण असून आता जगभरातून येणा-या गुंतवणुकीचे ब्रिटन स्वागत करेल असे स्पष्ट केले. टाटा समूहाने फोर्ड कंपनीकडून 2008 मध्ये ‘जॅग्वार लॅँड रोव्हर’चा प्रकल्प ताब्यात घेतला. ब्रिटनमधील हा ब्रॅँड टाटा खरेदी करणार म्हणून प्रारंभी थोड्याफार प्रमाणात विरोधही झाला होता. परंतु टाटांकडे हा ब्रॅँड आल्यानंतर ‘जेएलआर’ला नवसंजीवनी मिळाली. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी काही दीर्घकालीन योजना आखण्यात आल्या आहेत.
केवळ शाळेची फी भरू नका, तर मुलांचे प्रगतिपुस्तकही वाचा : इंद्रा नुई यांच्या टिप्स
पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आजकाल भरपूर पैसे खर्च करतात, पण मुलांचे प्रगतिपुस्तक बघत नाहीत हे ऐकून वाईट वाटते, पण माझा मुख्य भर हा नेहमीच प्रगतिपुस्तकावर असतो, असे उद्गार पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांनी जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना काढले. वास्तविक पाहता या परिषदेत नुई यांच्या भावुक भाषणात त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हे ऐकून उपस्थितही अचंबित झाले. नुयी म्हणाल्या की, 2006 मध्ये पेप्सिको कंपनीचे प्रमुखपद आल्यानंतर मी चेन्नईमध्ये आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर माझे विचार आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. चेन्नईला गेल्यानंतर दुस-या दिवशी पहाटे आईने मला उठवले. पण मी सुटीवर आलेली असल्याने दुपारपर्यंत झोपण्याची इच्छा असल्याचे सांगितले.