आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Third Super Power In The World, Purchasing Power Parity, Divya Marathi

जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती झाला भारत,परचेसिंग पॉवर पॅरिटीचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अनेक निराशाजनक बातम्या एकामागून एक कानांवर आदळत असतानाच एक चांगली बातमी समोर आली आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या (पीपीपी) आधारावर फक्त सहा वर्षांत जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी महाशक्ती झाला आहे. भारताने 2011 या वर्षात हे यश मिळवले आहे. 2005 मध्ये भारत 10 व्या क्रमांकावर होता. दरम्यान, अमेरिकेकडे सर्वांत मोठी महाशक्तीचे बिरूद कायम राहिले असून, चीन दुस-या स्थानावर कायम आहे.

बँकेच्या आंतरराष्ट्रीय तुलनात्मक कार्यक्रमांतर्गत (आयसीपी) बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीत हे रँकिंग देण्यात आले आहे. त्यानुसार 2011 मध्ये भारताचा जीडीपी 5.75 कोटी रुपये होता, तर जपानचा जीडीपी 4.37 लाख कोटी रुपये होता.

जागतिक जीडीपीत 6.4 टक्के वाटा : 2011 मध्ये जागतिक जीडीपीत भारताचा वाटा 6.4 टक्के होता, तर अमेरिका आणि चीनचा वाटा अनुक्रमे 17.1 आणि 14.9 टक्के होता. यादरम्यान जगाने 90 लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले. त्यातील अर्धे उत्पादन कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले.

अस्थिर सरकार भारताच्या क्रेडिट रेटिंगसाठी ठरू शकतो धोका : मूडी : मूडी या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने म्हटले आहे की, लहान पक्षांचे अस्थिर सरकार भारताच्या क्रेडिट रेटिंगसाठी सर्वांत मोठा धोका आहे. संस्थेने म्हटले आहे की, संसदेची गेल्या दोन दशकांची आकडेवारी पाहिली तर भारतात आघाडी सरकारे स्थापन झाले आहेत. आता पुन्हा लहान पक्षांनी मिळून बनवलेले अस्थिर सरकार स्थापन झाले तर तो देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीने सर्वांत मोठा धोका असेल.

काय आहे पीपीपी
परचेसिंग पॉवर पॅरिटीचा उपयोग विविध देशांमध्ये चालू असलेल्या किमतीचा फरक अ‍ॅडजस्ट करून लोकांचे उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेची तुलना करण्यासाठी होतो.

रँकिंग सुधारण्याचे कारण
अलीकडे भारतात महागाईचा दर वाढता असला तरी किमती अजूनही विकसित देशांच्या तुलनेत कमी आहेत. पीपीपीनुसार या अहवालात भारताचे हाय रँकिंग त्यामुळेच आहे. अहवालात म्हटले आहे की, चीन, भारत आणि इंडोनेशिया या आशियाई अर्थव्यवस्थांच्या तुलनात्मक रँकिंगमध्ये अमेरिकेच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे.