आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत होणार इंटरनेट महासत्ता, अमेरिकेवर करणार मात, स्मार्टफोनमुळे वाढले युजर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्मार्टफोनच्या संख्येते कमालिची वाढ झाल्याने येत्या आठ महिन्यात भारतातील इंटरनेट युसर्जची संख्या 18.53 टक्क्यांनी वाढणार असून जुन 2014 पर्यंत 24.3 कोटींवर जाणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. येत्या काही महिन्यात भारतातील नेटिझन्सची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असेही यात सांगण्यात आले आहे.
इंटरनेट अॅण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) तयार केलेल्या आय-क्युब 2013 या अहवालात सांगितले आहे, की जुन 2014 दरम्यान भारतातील इंटरनेट युजर्स 243 मिलियनच्या घरात असतील. यावेळी भारत संख्येच्या बाबतील अमेरिकेला मागे टाकेल. त्यानंतर जगाचा विचार केल्यास भारत सर्वांत जास्त इंटरनेट युजर्स असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरेल.
सध्या चीनमध्ये 300 मिलियन तर अमेरिकेत 207 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतातील इंटरनेट युजर्स 205 मिलियन असल्याचे आढळून आले आहे. यावरून भारतातील इंटरनेट युजर्समध्ये दरवर्षी 40 टक्के वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, स्मार्टफोनमुळे वाढले इंटरनेट युजर्स