आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बनणार टीव्ही, फ्रिज, एसीचे हब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताला निर्मिती उद्योगाचे माहेर मानणा-या टिकाऊ ग्राहकोपयोगी कंपन्या येथे विस्तार करण्याच्या योजना आखत आहेत. भारतीय वातावरणानुसार आणि भारतीय ग्राहक लक्षात घेऊन कंपन्या या 100 टक्के निर्मिती उद्योगाच्या देशात राहण्यासाठी वेगवगेळ्या योजना तयार करत आहेत. आगामी काळात या क्षेत्रात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे. असे झाले तर देशी कंपोनंट निर्मात्यांना दिलासा तर मिळेलच, शिवाय रोजगार निर्मितीही होईल. त्यामुळे भारत टीव्ही, फ्रिज, एसीचे मोठे औद्योगिक केंद्र बनण्याची शक्यता आहे. कॅरिअर मायडियाचे मुख्य संचालक कृष्ण सचदेव यांनी सांगितले की, देशात कंपनीचे निर्मिती केंद्र गेल्याच वर्षी सुरू झाले.