आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Return To 8% Growth Rate In 2 Years: P Chidambaram

विकासदर 6.7 % राहील: पी. चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेला भारत आणि चीनमुळे गती मिळेल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. चालू आर्थिक वर्षात (2013-14) भारताचा आर्थिक विकासदर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हार्वर्ड विद्यापीठातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, चीन आणि भारत सातत्याने जगाच्या अर्थव्यवस्थेला गती देतील. चालू आर्थिक वर्षात चीनचा आर्थिक विकास 8 ते 8.5 टक्के गतीने होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित करण्याच्या हेतूने सध्या अर्थमंत्री अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. आगामी काळात विकसनशील देशांना औद्योगिक विकासासाठी जास्त खर्च करावा लागेल. त्यामुळे विकसित देशांवरील कर्जाचा भार कमी होईल. भारताला गुंतवणुकीसाठी जास्त खर्च करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.