आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुबंई- जपानला मागे टाकून 2028 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि अमेरिकेवर कुरघोडी करून चीन अव्वल स्थान पटकावेल, असा अंदाज लंडनमधील ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ (सीईबीआर) या आर्थिक सल्लागार संस्थेने व्यक्त केला आहे.
या संस्थेने तयार केलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल’ या वार्षिक अहवालामध्ये नजकीच्या भविष्यात जपान कमकुवत चलन धोरणाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. थोडक्यात डॉलर मूल्यातील सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारत अगोदर व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत लवकर आघाडी घेण्याची शक्यता आहे. आक्रमक धोरणांमुळे अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारत आपली आगेकूच कायम ठेवेल, अशा संदर्भातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने यंदाच्या वर्षात कॅनडाने भारतावर मात करून राष्ट्रकुल देशांमधील दुसरी तर जगातील दहावी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला 2018 पासून एक नवी उभारी मिळून ती नवव्या स्थानावर येईल आणि त्यानंतर 2023 मध्ये चौथे, तर 2028 मध्ये तिसरे स्थान प्राप्त करेल,असे अहवाल सांगतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.