आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Ahead Of America , Europe In Wealth Making

अमेरिका, युरोपच्या तुलनेत भारतात संपत्ती निर्मितीत सर्वाधिक वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील वर्षाच्या मध्यापासून ते यंदाच्या वर्षाच्या मध्यापर्यंतच्या काळावर प्रकाश झोत टाकला असता देशातील संपत्ती निर्मितीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. कारण याच कालावधीत देशातल्या घरगुती संपत्तीचे प्रमाण 7.4 टक्क्यांनी वाढून 3.6 ट्रिलियन डॉलरवर गेले असल्याचे एका अहवालात दिसून आले आहे.


उत्तर अमेरिका (11.9 टक्के) आणि युरोप (7.7 टक्के) या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतातील घरगुती संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली असल्याचे क्रेडिट सूसच्या जागतिक संपत्ती अहवालामध्ये म्हटले आहे.
जागतिक पातळीवरील घरगुती संपत्ती निर्मितीचे प्रमाण 4.9 टक्क्यांनी वाढून ते 240 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले असल्याचे या अहवालात म्हटले असून त्यामध्ये अमेरिकेतील घरगुती संपत्ती वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक 72 टक्के आहे.
दरम्यान, जागतिक पातळीवरील प्रत्येक प्रौढ व्यक्तीमागील सरासरी संपत्तीचे प्रमाण 51,600 डॉलर अशा नवीन कमाल पातळीवर गेले आहे; परंतु जगातील सर्वांत मोठी लोकशाही अर्थव्यवस्था, भक्कम आर्थिक पाया आणि सक्षम बाजारपेठ या बळावर भारताने 2000 पासूनच संपत्ती निर्मितीचा वेग पकडला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
स्थावर मालमत्तेकडे ओढा
० प्रत्येक प्रौढ व्यक्तीमागील संपत्तीचे प्रमाण 2000 मध्ये दोन हजार डॉलरवरून 2013 मध्ये ते 4700 डॉलरपर्यंत गेले; परंतु त्यातही प्रौढांच्या लोकसंख्येचे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढले असल्याने याच कालावधीत सरासरी संपत्ती निर्मितीचे प्रमाण तिपटीपेक्षा जास्त आहे.
० बहुतांश विकसनशील देशांमध्ये वैयक्तिक संपत्ती विशेष करून भारतामध्ये स्थावर मालमत्ता आणि अन्य रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळवली असून एकूण घरगुती संपत्तीमध्ये त्याचे प्रमाण 86 टक्के आहे. भारतातील संपत्तीचे प्रमाण लक्षणीय वाढत असून मध्यमवर्गीय श्रेणी आणि सधन व्यक्तींचे प्रमाण वाढत आहे.