आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Airline Service News In Marathi, British Airways, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय विमान प्रवाशांसाठी कंपन्यांकडून सवलतींचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्रिटिश एअरवेजला भारतीय अवकाशात नऊ दशके पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ९० टक्के सवलतीची योजना जाहीर केली आहे. या ऑफरनुसार मुंबई ते लंडन रिटर्न तिकीट ४०,२५२ रुपयांत (इकॉनॉमी श्रेणी)मिळणार असून ऑक्टोबरमध्ये यावर प्रवास करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आठवड्यापूर्वीच कंपनीने भारतातून इंग्लंड, अमेरिका, दक्षिण अमेरिका तसेच वेस्ट इंडीजमध्ये जाणा-या प्रवाशांसाठी िवशिष्ट ठिकाणांसाठी ५० टक्के सवलतीची ऑफर जाहीर केली होती. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत तिकिटांचे आरक्षण करावे लागणार आहे. त्याआधीच्या आठवड्यात कतार एअरवेज आणि सिंगापूरची वाजवी दरात सेवा देणा-या टायगर एअरने भारतीय विमान वाहतूक बाजारातील हिस्सा वाढीसाठी मर्यादित कालावधीसाठी सवलत देऊ केली आहे.

टायगर एअरने केवळ १० रुपयांत सिंगापूर एकेरी मार्गाचे तिकीट ऑफर केले आहे. तर कतार एअरवेजच्या ऑफरनुसार २५ टक्के सवलतीच्या दरात १४० ठिकाणांसाठी विमान प्रवास करता येणार आहे.

जेवण मिळणार
जेट एअरवेजच्या विमानाने प्रवास करणा-यांना एक डिसेंबरपासून विमान प्रवासात जेवण कॉम्प्लिमेंटरी मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

भारतीय कंपन्यांचा धडाका
भारतातील जवळपास सर्वच विमान वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांसाठी सवलतींचा धडाका लावला आहे. स्पाइसजेट, इंडिगो, गो एअर, जेट एअरवेज आणि एअर इंडिया या कंपन्यांनी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. एअर एशियाने शुक्रवारी नवी ऑफर जाहीर केली. त्यानुसार कंपनीच्या सर्व उड्डाणासाठी २० टक्के सवलतीत ितकिटे मिळणार आहेत.