सिंगापूर| नवी दिल्ली - भारतातील अब्जाधीशांची संख्या घटली आहे. मागील वर्षी देशात १०३ अब्जाधीश होते, आता ही संख्या १०० वर आली आहे. असे असले तरी जगातील अब्जाधीशांच्या यादीत भारताचे सहावे स्थान कायम आहे. विशेष म्हणजे, िस्वत्झर्लंड, हाँगकाँग आणि फ्रान्सच्या तुलनेत भारतात जास्त अब्जाधीश आहेत.
वेल्थ-एक्स आणि यूबीएस यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बिलिनेअर सेन्सस-२०१४ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार एक अब्ज डॉलर (सुमारे ६० अब्ज रुपये) पेक्षा जास्त संपत्ती असणा-या या १०० भारतीय कुबेरांकडे एकूण १७५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची घट आली आहे.