आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Companies FDI Investment Decrease, Asocham Survey

भारतीय कंपन्यांचे विदेशात गुंतवणूक करण्याचे प्रमाण घटले,असोचेमची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील धोरण लकव्यामुळे भारतीय कंपन्या विदेशात जास्तीत जास्त गुंतवणूक करीत असल्याचा एक साधारण समज सध्या आहे, परंतु एका अभ्यासामध्ये मात्र मागील वर्षातल्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा याच कालावधीत भारतीय कंपन्यांचे विदेशातील गुंतवणुकीचे प्रमाण घटले असल्याचे दिसून आले आहे. धोरणांची अंमलबजावणी होत असल्याने भारतीय कंपन्यांनी विदेशात गुंतवणूक करीत असल्याचे म्हटले जात असले तरी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून विदेशात करण्यात आलेली निव्वळ गुंतवणूक ही उर्वरित जगाच्या तुलनेत 952 दशलक्ष डॉलर अशी नोंद झाली आहे. मागील वर्षातल्या याच कालावधीतील 3.4 अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी असल्याचे ‘असोचॅम’ने केलेल्या एका पाहणीत म्हटले आहे.
उलट यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय व्यावसायिकांनी स्वदेशात पाठवलेल्या रकमेचे प्रमाण अगोदरच्या वर्षातल्या 2.29 अब्ज डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 3.23 अब्ज डॉलर असल्याचे एका अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे.
असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांच्या मते, नवीन गुंतवणूक देशाच्या बाहेर जात असल्याचे कोणत्याही ठोेस आधाराशिवाय काही व्यक्तींनी केलेले वक्तव्य किती चुकीचे आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. उलटपक्षी स्थानिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ अशा दोन्ही ठिकाणी गुंतवणुकीचे प्रमाण घटले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मागील वर्षातल्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा याच कालावधीत् कंपन्यांचे विदेशातील गुंतवणुकीचे प्रमाण घटले आहे.
जोखीम वाढल्याचा परिणाम
* वास्तविक पाहता जगाच्या बहुतांश भागांत आर्थिक ताण जास्त असल्यामुळे मालमत्ता स्वस्त झाल्या आहेत; परंतु जोखमीचे प्रमाण वाढल्यामुळे ती मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा देखील कमी झाली आहे. काही भारतीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्या तरी त्यांच्यावर कर्जाचा भार असल्याकडेही या अभ्यासात लक्ष वेधण्यात आले आहे.
* भारतीयांचे गेल्या आर्थिक वर्षात जागतिक पातळीवरील निव्वळ विदेशी थेट गुंतवणुकीचे प्रमाण 7.13 अब्ज डॉलर इतके सर्वाधिक होते, परंतु पहिल्या सहामाहीतील कल बघता विदेशी थेट गुंतवणूक म्हणून दोन अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कमही देशाच्या बाहेर गेलेली नसल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे.