आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Companies Investment In Marathi, Dollar Investment, Divya Marathi

भारतीय कंपन्यांची विदेशात 29.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चालू आर्थिक वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत भारतीय कंपन्यांच्या देशाबाहेरील थेट परकीय गुंतवणुकीत काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या कंपन्यांच्या परकीय संपत्तीच्या अधिग्रहणावर 29.34 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला असल्याचे एका अहवालात दिसून आले आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत विदेशात भारतीय कंपन्यांची थेट परकीय गुंतवणूक कमी राहिली होती.


‘केअर रेटिंग्ज’च्या अहवालानुसार 2006-07 ते 2010-11 या काळात बाहेरील विदेशी गुंतवणुकीत तेजीने वाढ झाली आहे. मात्र, त्यानंतर यात झपाट्याने घट नोंदली. 2011-12 आणि 2012-13 या काळात यात घट झाली आणि 2013-14 मध्ये यात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी यादरम्यान देशी कंपन्यांची एकूण एफडीआय गुंतवणूक 29.34 अब्ज डॉलर राहिली. 2002-03 तथा 2003-04 या काळात काही मर्यादित विदेशी गुंतवणुकीनंतर यात हळूहळू सुधारणा झाली. 2004 मध्ये विदेशी गुंतवणूक धोरणाचे उदारीकरण होण्याचा हा परिणाम होता.