आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cotton News In Marathi, China, Divya Marathi

चीनवर मात करुन भारत होणार ‘कॉटन किंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या वर्षात भारत कापूस उत्पादनात चीनवर मात करून अव्वल क्रमांकाचा उत्पादक होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच भारत प्रथमच ‘कॉटन किंग’ होण्याची शक्यता अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कृषी खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ऑगस्टपासून सुरू झालेल्या हंगामामध्ये भारताने ३० दशलक्ष गासड्या कापूस उत्पादन करण्याचा, तर चीनमध्ये २९.५ दशलक्ष गासड्या उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेिरकेच्या कृषी खात्याने मागील महनि्यात २९ दशलक्ष गासड्या कापूस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु या महिन्यामध्ये वाढीव अंदाज व्यक्त केला असून चीनच्या उत्पादनाच्या िस्थतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही.

चीनच्या पूर्व प्रांतात कापसाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना काही सवलती देण्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ ११ टक्क्यांनी कमी होऊन ते ४.३५ दशलक्ष हेक्टरवर येण्याचा अंदाज आहे. प्रतिहेक्टर १,४७७ िकलाेग्रॅम असे विक्रमी कापूस उत्पादन होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

भारतामध्ये उशिरा झालेला पाऊस कापूस िपकासाठी लाभदायक ठरणार आहे. काही क्षेत्रफळ हे पर्यायी िपकांसाठी राखून ठेवले जात होते. परंतु आता परत कापूस लागवडीकडे वळतील असा अंदाज आहे.

चीनमध्ये क्षेत्र घटले
चीनमधील कापूस लागवडीखालील क्षेत्र यंदा ८.७ टक्क्यांनी कमी होऊन उत्पादन घटण्याचा अंदाज एका ताज्या आकडेवारीत व्यक्त केला आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्र कमी होत असल्याने चीनच्या कापूस बाजारपेठेत पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
भारतीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये यंदाच्या वर्षात १२ सप्टेंबरपर्यंत १२.५२ दशलक्ष हेक्टर जागेवर कापूस लागवड झाली असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत १०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षात याच कालावधीत ११.३५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली होती.