आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Economy Grows 4.7% In Third Quarter News In Marathi

आर्थिक वाढीची धाव कुंपणापर्यंतच;विकास दर 4.9 टक्के राहण्याचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये आर्थिक विकास वाढ केवळ 4.7 टक्क्यांपर्यंतच मजल मारू शकली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीच्या तुलनेत विकास दरात 4.9 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सध्याच्या परिस्थितीत तरी कठीण दिसत आहे.

कोळसा, पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने, नैसर्गिक वायू या काही प्रमुख क्षेत्रांमधील उत्पादन घटल्यामुळे प्रमुख पायाभूत क्षेत्राचा विकासही मंदावून तो जानेवारी महिन्यात 1.6 टक्क्यावर आला आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत पायाभूत क्षेत्राने 8.3 टक्क्यांच्या पोषक वाढीची नोंद केली होती. पायाभूत क्षेत्राच्या निराशाजनक कामगिरीमुळे उद्योग क्षेत्राच्या चिंता वाढल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत उत्पादनात 0.7 टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्राने वर्षभरापूर्वी 2.5 टक्क्यांची वाढ नोंदवली, परंतु आता उत्पादन क्षेत्रात 1.9 टक्के घट झाल्याने उद्योग क्षेत्राने तीव्र चिंता व्यक्त केली.