आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Economy News In Marathi, Asian Development Bank, Divya Marathi

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लवकरच अच्छे दिन, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच चांगले दिवस येतील, असे मत मनिलास्थित एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) व्यक्त केले आहे. पुढील आर्थिक वर्षात (2015-16) भारताच्या आर्थिक वाढीचा दर 6.3 टक्के राहील, असा अंदाज एडीबीने वर्तवला आहे. आर्थिक सुधारणा गतीने होत असल्याचे कारण बँकेने दिले आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्था 5.5 टक्क्यांनी विकास साधेल असे बँकेला वाटते.

एडीबीच्या मते, भारतात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता प्रलंबित आर्थिक सुधारणा मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील 5.5 टक्के वाढीचा अंदाज कायम ठेवण्यात आला असून 2015-16 या आर्थिक वर्षासाठी 6.3 टक्के दराने विकास होईल. यापूर्वी 2015-16 या आर्थिक वर्षासाठी एडीबीने 6 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता. अमेरिकेत अपेक्षित कामगिरी झालेली नाही. तरीही आशियातील विकसनशील देशांच्या आर्थिक विकासावर फारसा परिणाम होणार नाही.

चीन, भारतावर लक्ष
आशियातील विकसनशील देशांत आर्थिक वाढ स्थिर राहील. चीनमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. भारतातही आर्थिक सुधारणा गतीने होण्याची शक्यता आहे.
जुझहोंग झुहुयाँग, प्रमुख अर्थतज्ज्ञ, एडीबी