आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Firms Collect Rs 39,000 Cr In Fresh Capital, QIP Most Preferred Route

समभाग बाजारातून कंपन्यांनी वर्षात उभारला ३९,००० कोटी रुपयांचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय कंपन्यांनी समभाग बाजारपेठेच्या माध्यमातून ३९ हजार कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. त्यातही व्यावसायिक गरजांची पूर्तता करण्यासाठी भांडवल उभारणीचा एक भाग म्हणून क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटला (क्यूआयपी) कंपन्यांनी सर्वात जास्त पसंती दिली असल्याचे िदसून आले आहे. परंतु गेल्या वर्षातल्या ४५,४४० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा निधी उभारणीचे प्रमाण घटले आहे.

क्यूआयपी, ऑफर्स फॉर सेल, आयपीओ, फॉलोऑन पब्लिक ऑफर आणि इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट प्रोग्राम या माध्यमातून कंपन्या समभाग बाजारपेठेत निधीची उभारणी करतात.

भांडवल बाजारात तेजीचे वातावरण असतानाही आयपीओ आणि एफपीओसारख्या माध्यमातून समभागांची विक्री करून प्राथमिक समभाग बाजारातून निधी उभारण्याचे प्रमाण यंदा घटले. यंदाच्या वर्षात सार्वजनिक समभाग बाजारपेठेतून एकूण ३९,१२७ काेटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असल्याची माहिती प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हाल्दिया यांनी दिली.

फक्त एकच एफपीओ : संपूर्ण वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील इंजिनिअर इंडिया लि. या केवळ एकच कंपनीला फॉलोऑन ऑफर आली.

एसएमई आयपीओला वेग : सरत्या वर्षात ४० एसएमई आयपीओच्या माध्यमातून २६७ कोटींचा एकूण निधी जमा झाला.