आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनमुळे कापसाचा घात; मराठवाडा, विदर्भात पेरा घटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पावसाने मारलेल्या दडीमुळे सर्वात जास्त परिणाम कापूस पिकावर पडणार आहे. कापूस पिकवणार्‍या प्रमुख भागात आतापर्यंत 60 ते 80 टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचा पेराही 45 टक्क्यांनी घटला आहे. तज्ज्ञांच्या मते, या वर्षाअखेरपर्यंत कापसाच्या किमती 20 किलोसाठी 1250 रुपये अशा वाढण्याची शक्यता आहे.

मध्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विदर्भात सरासरीपेक्षा 66 टक्के पाऊस कमी झाला आहे, तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा 80 टक्के पाऊस कमी पडला आहे. गुजरातची किनारपट्टी वगळता बहुतेक क्षेत्रात अद्याप मान्सून पोहोचलेला नाही. मध्य प्रदेशातही मान्सून अद्याप पूर्णपणे पोहोचलेला नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत 40 लाख हेक्टरपैकी केवळ 5 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यातील बहुतेक भागांत तापमान वाढल्याने पेरलेले बियाणे वाळून जात आहेत. 2011 मध्येही जूनमध्ये दुष्काळी स्थिती असतानाही 10 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. महाराष्ट्रात आतापर्यंत 2.27 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आंध्र प्रदेशात मागील वर्षी 3.48 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 0.69 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

महाराष्ट्रात कापसाची लागवड 18 ते 20 जुलैपर्यंत होते, तर आंध्र प्रदेशात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापूस लागवड होते.

किंमतवाढीची कारणे
मागील तीन वर्षांत कापसाच्या किमतीत जास्त चढ-उतार झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आता दुसर्‍या पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. यामुळे देशातील कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जगातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था रुळावर येत आहेत. त्यामुळे कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे.

(डेमो पिक)