नवी दिल्ली- अमेरिकन बाईक निर्माता कंपनी 'इंडियन मोटरसायकल'ने आपल्या तीन बाइक्सच्या लॉन्चिंगसह भारतीय बाजारात पाऊल ठेवले आहे. 'इंडियन मोटरसायकल'ने आपल्या तिन्ही बाइक्स सीबीयूनुसार (कंप्लिटली ब्यूल्ट यूनिट) उपलब्ध केल्या आहेत. यूएसमधून थेट भारतात आयात करणार आहे.
'इंडियन मोटरसायकल' आपले पहिले शोरूम गुडगावमध्ये सुरु करणार आहे. 7 मे रोजी या शोरुमचे उद्घाटन होणार आहे. दुसरे शोरुम मुंबईत सुरु करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
'इंडियन चीफ क्लासिक' ही पहिली बाइक असून तिची किंमत 26.5 लाख रूपये, दुसरी बाइक 'इंडियन चीफ व्हिंटेज'ची किंमत 29.5 लाख रूपये तर तिसरी आणि सगळ्यात महागडी 'इंडियन चीफ्टेन'ची किंमत 33 लाख रूपये (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे.
'इंडियन मोटरसायकल'च्या तिन्ही बाइक्समध्ये 1811 सीसीचे थंडरस्ट्रॉक 111 व्ही-टि्वन इंजिन बसवले आहे. तसेच 6 स्पीड कॉन्टेंट मेस हेलीकल गिअरबॉक्स आहे.
भारतात इंडियन मोटरसायकलच्या या बाइक्स हार्ले डेव्हिडसन तसेच ट्रायम्फ बाइक्सचा टक्कर देऊ शकतात.
पुढे वाचा, मर्सिडीज बेंजच्या ए-क्लास कार पेक्षाही अधिक किंमत...