आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian National Rally Championsheep Held In Nashik

MOTOR SPORT: इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीप नाशकात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- क्रिकेट देशात सर्वाधिक लोकप्रिय असले तरी मोटर स्पोर्ट्सबाबत हळूहळू आवड निर्माण होत असून नवनवे उत्पादक आणि पुरस्कर्ते याकडे वळणे गरजेचे आहे. भारतातील ज्या तरुणांना या क्षेत्राकडे यायचे आहे त्यांना संधी मिळेल असे, फोक्‍सवॅगन मोटारस्पोर्ट विभागाचे प्रमुख पृथ्वीराज सिद्धप्पा यांनी सांगितले

इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपचा महाराष्ट्रातील दुसरा टप्पा यंदा नाशिकमध्ये होणार आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली. सिद्धप्पा पुढे म्हणाले की, आमच्या कंपनीने त्यासाठी वेगळी कस्टमर स्पोर्ट्स डिव्हिजन सुरु केली आहे. त्यामार्फत देशातील उदयोन्मुख रेसिंग आणि रॅली स्पर्धकांना निवडणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. स्लाईड वेज इंडस्ट्रीला नाशिकच्या स्पर्धेसाठी दिलेला पाठींबा हे त्याचेच उदाहरण आहे.

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये या क्रीडाप्रकाराचे अधिक चाहते निर्माण होत असून सध्या टोयोटा, महिंद्र आणि फोक्‍सवॅगन, जेके टायर अशा कंपन्या स्पर्धेला आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत आहेत ही संख्या आगामी काळात वाढेल अशी अपेक्षा आहे

स्लाईड वेज इंडस्ट्रीने पुण्याजवळ चाकण येथे रेसिंग कारसाठी खास ट्रॅक तयार केला आहे. यंदापासून चाहते आणि स्पर्धकांना अधिक चांगल्या सोयी देऊन उपलब्ध केला जाणार असल्‍याची माहिती कंपनीचे पदाधिकारी रोहन पवार यांनी दिली. येथे येणाऱ्या स्पर्धकांना सवलतीत सुटे भाग आणि तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. नाशिकमध्ये येत्या सात ते नऊ जून या काळात रॅली होत असून त्‍यामध्‍ये स्लाईड वेजचे पाच स्पर्धक पाच फोक्‍सवॅगन कारसह सहभागी होत आहेत असेही त्यांनी सांगितले