आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Origin Satya Nandela Become The CEO Of Microsoft

मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी भारतीय वंशाचे सत्या नाडेला विराजमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट' मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने ही अधिकृत घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी सत्या नाडेला यांचे अभिनंदन केले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदासाठी दोन भारतीयांमध्ये कट्टर स्पर्धा होती. त्यात हैदराबादचे सत्या नाडेला आणि चेन्नईचे सुंदर पिचाई यांच्या खरी स्पर्धा झाली. याशिवाय 'फोर्ड'चे सीईओ अॅलन मूलॅली यांचेही नाव चर्चेत होते. स्टीव्ह बाल्मर यांचे उत्तराधिकारी म्हणून नाडेला यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या 38 व्या वर्षांच्या वैभवशाली इतिहासातील सीईओपदाचा कार्यभार सांभाळणारे नाडेला तिसरेच सीईओ आहेत.

नाडेला गेली 22 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे कंपनीने बाहेरील व्यक्तीला संधी देऊन धोका पत्करण्याऐवजी नाडेला यांना संधी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सत्या यांनी मायक्रोसॉफ्ट क्रांतीकारी बदल...