आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Ownership On Blackberry, Big Deal After Microsoft Take Ove Nokia

‘ब्लॅकबेरी’वर भारतीय मालकी, नोकिया मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्यानंतर मोठी घडामोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरँटो - नोकियापाठोपाठ मोबाइलच्या क्षेत्रात अग्रेसर ब्लॅकबेरी कंपनीही विक्रीस निघाली आहे. विशेष म्हणजे नोकिया मायक्रोसॉफ्टने विकत घेतली तर ब्लॅकबेरी कंपनी भारतीय वंशाचे प्रेम वत्स खरेदी करणार आहेत.
वत्स मूळ हैदराबादचे रहिवासी असून सध्या त्यांचे कॅनडात वास्तव्य आहे. फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंगचे संस्थापक चेअरमन आणि सीईओ असलेले वत्स कॅनडाचे वॉरन बफेट मानले जातात.


गेल्या ऑगस्टपर्यंत वत्स ब्लॅकबेरीच्या संचालक मंडळात होते. कंपनी विक्रीस निघत असल्याचे समजल्यावर त्यांनी राजीनामा दिला आणि तीच कंपनी सावरण्यासाठी ते पुढे आले आहेत. फेअरफॅक्सच्या माध्यमातून प्रतिशेअर 566 रुपये याप्रमाणे 294 अब्ज रुपयांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला असून तो मंजूर झाला तर प्रेम वत्स हे ब्लॅकबेरीचे मालक होतील. ब्लॅकबेरीमध्ये वत्स यांच्या फेअरफॅक्स कंपनीची सर्वाधिक 10 टक्के भागिदारी आहे. 2012 मध्ये त्यांच्याकडे फक्त 2 टक्के शेअर्स होते.


ब्लॅकबेरीच्या अडचणी
* विक्रीत प्रचंड घट, 1 अब्ज डॉलर तोटा होण्याचा अंदाज. ३ गेल्या वर्षी 4500 कर्मचा-यांची कपात करण्याचा निर्णय. * जागतिक बाजारपेठेत वाटा 3.7 टक्क्यांवर.


4 नोव्हेंबरला निर्णय?
फेअरफॅक्सशी चर्चा सुरू असल्याचे ब्लॅकबेरीने म्हटले आहे. यावर 4 नोव्हेंबरला निर्णय होऊ शकतो. चार-पाच वर्षांत ब्लॅकबेरी सावरेल, अशी वत्स यांना आशा आहे.