आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian People Accent News In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीयांकडील घरगुती संपत्ती 6 टक्क्यांहून कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिकेतील 45 टक्क्यांच्या तुलनेत भारतीयांकडील घरगुती आर्थिक संपत्ती सहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. शेअर बाजार निर्देशांक गेल्या दोन दशकांत 26 पटींपेक्षा जास्त वेगाने वाढूनदेखील भारतीय बाजारपेठेत ही परिस्थिती असल्याचे मत अँक्सिस सिक्युरिटीजने व्यक्त केले आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून समभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. घरगुती वित्तीय मालमत्तेतून स्थावर जंगम मालमत्ता वगळल्यास भारतीयांकडे केवळ सहा टक्के समभाग मालकी असून अमेरिकेत हेच प्रमाण 45 टक्के आहे. त्यामुळे अगोदरच्या तुलनेत दर्जेदार वित्तीय सल्ल्याची गरज आज जास्त महत्त्वाची असल्याचे मत अँक्सिस सिक्युरिटीजचे संचालक नीलेश शहा यांनी व्यक्त केले. अँक्सिसडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किट आणि ए डायरेक्ट टेक या गुंतवणूक पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

बचत करणार्‍यांची बचत गुंतवणुकीत परावर्तित होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मार्केट हा गुंतवणुकीचा मार्ग आहे, त्यातून दीर्घकाळासाठी चलनवाढीचा सामना करणे शक्य आहे. तरीही समभागातील गुंतवणूक आजही कमी असल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले.त्या तुलनेत काही वर्ग वगळता भारतीयांच्या गुंतवणुकीचे प्रमाण खूप कमी आहे.