आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Pharma Sun Pharma To Buy Ranbaxy Laboratories

\'रॅनबॅक्‍सी लॅबोटरिज\' 3.2 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करणार सन फार्मास्युटिकल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - भारतामधील अग्रगण्य औषध निर्माता कंपनी रॅनबॅक्सी लेबरेटरीज लिमिटेडला अमेरिकेतील सन फार्माने 3.2 अरब डॉलर्स (19 हजार करोड़ रूपये) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सन फार्माने आपला निर्णय सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकद्वारे जाहीर केला. रॅनबॅक्‍सी कंपनी ही जगामधील एकूण औषधांपैकी 20% औषधे पुरवित असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र, या औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

'रॅनबॅक्‍सी' या कंपनीमध्ये जपानच्या दाईची सांकयो या कंपनीचे 63.4% भाग (शेअर) आहेत. यामुळे दाईची कंपनीने आता 'रॅनबॅक्‍सी'मधील गुणवत्तेची समस्या सोडविण्यासाठी काही तज्ज्ञ पाठविले असून कंपनीस सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

रॅनबॅक्‍सीच्या विक्रीच्या झालेल्या करारानुसार, दाईची कंपनी ही सन कंपनीमध्ये सुमारे 9% भागधारक असेल; तर रॅनबॅक्‍सीमधील भागधारकांना त्याच्या प्रत्येक भागामागे सन कंपनीमधील 0.8 भाग दिला जाणार आहे. 'रॅनबॅक्‍सी' कंपनीच्या एका भागाची किंमत 457 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. मात्र, या विक्रीमुळे दाईची कंपनीने भारतामधील गुंतवणूक संपविल्याचा अंदाज तज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे.