आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway Budget News In Marathi, Divyamarathi

रेल्वे बजेट: मंत्र्यांनी खेचली रेल्वे अर्थसंकल्पाची ‘चेन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेत सलग सहाव्या दिवशीही गोंधळ झाला. 2014-15 चा हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मंजूर होणार होता. कामकाज होईल अशी अपेक्षा होती. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प होता. उर्दूत शायरीही केली होती; पण कोणीही रस दाखवला नाही. खरगे यांना तेलंगणाच्या मुद्दय़ावरून घोषणाबाजी व गोंधळामुळे 20 मिनिटांतच थांबावे लागले. यूपीएच्या मंत्र्यांनी 20 मिनिटांत चेन ओढत त्यांचे भाषण थांबवले.
लोकसभेत दुपारी 12 वाजता कामकाज सुरू झाले. त्या वेळी 30 खासदार उपस्थित होते. हंगामी अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच खासदारांची संख्या वाढली. टीडीपीच्या एका खासदाराने लोकसभेतील एका कर्मचार्‍याकडून पेन आणि कागद हिसकावले. घोषणाबाजीमुळे खासदारांची आपसांतच लटकली. शरद यादव (जेडीयू), जगदंबिका पाल (काँग्रेस) आणि सौगत रॉय (तृणमूल काँग्रेस) यांनी हस्तक्षेप केला. टीडीपीचे नरमल्ली अध्यक्षांसमोर खुर्चीवर चढले. दरम्यान, यूपीए खासदारांनी खरगेंना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याभोवती घोळका केला होता. दुसर्‍या रांगेतील खरगेंजवळ रोजच्या तुलनेत अधिक खासदार होते.

आग्रा, जयपूर स्टेशनवर ‘ग्रीन कर्टन’
आग्रा आणि जयपूर स्थानकांवर ‘ग्रीन कर्टन’चा पथदर्शी उपक्रम राबवला जाईल. त्यात ठरावीक अंतरापर्यंत सुरक्षा भिंत तयार केली जाईल. पटर्‍यांजवळ घाण होऊ दिली जाणार नाही. स्थानिक प्रशासनाची मदत घेणार.

शेअर बाजाराचे ‘थम्ब-डाऊन’
रेल्वे अर्थसंकल्पाला इंडिया इंकने थम्स अप दिले असले तरी शेअर बाजाराने थंब डाऊन केले. रेल्वेशी संबंधित हिंद रेक्टिीफायर्सचे शेअर 10.09 टक्के, तर केमेक्स मायक्रोसिस्टिम्स इंडियाचे शेअर 4.04 टक्क्यांनी घसरले.

19,655 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प
2014-15 मध्ये रेल्वेला 1.60 लाख कोटींचे उत्पन्न आणि 19,655 कोटींच्या निव्वळ नफ्याचा अंदाज आगे. मालभाडे 1.05 लाख कोटी, प्रवासी भाडे 45 हजार कोटी रुपये व इतर स्रोतांकडून 10 हजार कोटी रुपये मिळू शकतात.

मोबाइलवर मिळणार तिकिटाचे कन्फर्मेशन
वेटिंग तिकीट कन्फर्म होताच एसएमएस मिळणार आहे. रोख स्वीकारणारी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनही बसवण्यात येणार आहेत. मोबाइल फोनवरही तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीएनआर आणि गाड्यांचे अपडेटही देण्यात येत आहेत. प्रमुख स्थानकांवर रेस्ट हाऊस आणि निवडक मार्गांवर जेवणाची ऑनलाइन बुकिंग होत आहे.

नवे कारखाने, विशेष डिझाइनचे डबे
छाप्रा येथे रेल्वे व्हील प्लँट, रायबरेलीमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना आणि दानपुनी येथे डिझेल कॉम्पोनंट कारखाना सुरू झाला आहे. काश्मीर खोर्‍यातील हवामानानुसार नव्या डब्यांचे डिझाइन केले आहेत. गंजरोधक, हलके डबेही तयार करण्यात आले आहेत.

आता मोदीजींनाच सर्व करावे लागेल : भाजप
हंगामी रेल्वे अर्थसंकल्पात कोणत्याही धोरणात्मक घोषणा करता येत नाहीत. तरीही र्मयादित साधने असतानाही प्रत्येक क्षेत्रातील लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधी रेल्वे अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर प्रादेशिकतावादाचे आरोप केले जात होते. परंतु या वेळी असे काहीही नाही, असे रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी म्हणाले. दरम्यान, बजेटमध्ये काहीही नाही. सरकारने पराभव मान्य केला आहे. त्यांनी सगळे काही मोदीजींवर सोडून दिले आहे. आता त्यांनाच सर्व काही पाहून घ्यावे लागणार आहे, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे.

पार्सल धोरणात बदल, दूध ट्रान्सपोर्ट वाढणार
पार्सल व्यवसायात मिळकत वाढण्याची रेल्वेला आशा आहे. त्यामुळेच पार्सलबाबत नवे धोरण आखण्यात येणार आहे. देशभरात दूध वाहतूकीला प्रोत्साहन दिले जाईल. हब आणि स्पोकच्या नव्या कन्सेप्टवर काम होईल. विशेष पार्सल टर्मिनलमध्ये थर्ड पार्टी गोदामावरही विचार केला जात आहे. मिळकत वाढवण्यासाठी ठरावीक वेळेला रेल्वेकडून विशेष पार्सल गाड्या सुरू केल्या जातील.

फेर्‍या वाढल्या
1. बिदार-यशवंतपूर एक्स. (आठवड्यातून सलग 3 दिवस)
2. हुबळी-विजयवाडा एक्स्प्रेस (आठवड्यातून सलग 3 दिवस)
3. हुबळी-सिकंदराबाद एक्स्प्रेस
(आठवड्यातून सलग 3 दिवस)

विस्तार
1. दिल्ली-सराय रोहिल्ला-सुजानगड एक्स्प्रेस जोधपूरपर्यंत जाणार
2. पाटणा-सहरसा एक्स्प्रेस मुरलीगंजपर्यंत
3. काठगोदाम-भगत की कोठी रानीखेत एक्स. जैलमेरपर्यंत

3 डेमू गाड्या
1. मोरबी-मलिया मियाना
2. रतलाम-फतेहचंद चंद्रावती गंज (दररोज) गेज बदलल्यानंतर
3. रेवाडी-रोहतक (दररोज)

1. आणंद-डाकोर (रोज 2)
2. अनूपपूर-अंबिकापूर (6 दिवस) 3. दिल्ली-रोहतक (रोज 2 फेर्‍या) 4. संत्रागाचि-झारग्राम (5 दिवस)

1. बीना- कटनी (दररोज)
2. डेकरगाव नहरलगुन (दररोज) (नव्या लाइनचे काम पूर्ण झाल्यावर)
3. गुनुपूर-विशाखापट्टणम पॅसेंजर (दररोज)
4. हुबळी-बेळगाव फास्ट पॅसेंजर (दररोज)
5. जयपूर-फुलेरा पॅसेंजर (दररोज)
6. मन्नारगुडी- मयिलादुथुरई पॅसेंजर (दररोज)
7. पुनालूर- कन्याकुमारी पॅसेंजर (दररोज)
8. संबळपूर- भवानीपटणा पॅसेंजर (दररोज)
9. टाटानगर- चाकुलिया पॅसेंजर (दररोज)
10. तिरुचेंदुर- तिरुनवेली पॅसेंजर (दररोज)

नात म्हणाली, ‘ते आजोबांना का बोलू देत नाहीत? ’
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. पत्नी राधा, मुलगा मिलिंद, मुली प्रियदर्शनी आणि जयर्शी यांच्यासह नात प्रार्थनाही उपस्थित होती. पण खरगे यांना बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ती निराश झाली. ती बाहेर येताना ही निराशा जाणवली. ‘हे लोक आजोबांना का बोलू देत नाहीत? त्यांचे कोणी का ऐकत नाही?’ असा प्रश्न तिने केला.

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी रेल्वे अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले, तेव्हा लोकसभेत गोंधळ सुरू होता. तेलंगणाला राज्याचा दर्जा देण्याचा विरोध करणारे 30 खासदार वेलमध्ये होते. त्यांनी कागद फाडले. रेल्वेमंत्र्यांकडेही फेकले.

दिल्ली-मुंबई प्रीमियम एसी रेल्वेचे यश पाहता 17 नव्या प्रीमियम गाड्या सुरू होतील. राजधानी एक्स्प्रेसपेक्षा यातून 48 टक्के अधिक नफा झाला आहे.

नव्या प्रीमियम गाड्या अशा
1. हावडा-पुणे एसी एक्सप्रेस (आठवड्यातून दोनदा)मार्गे नागपूर, मनमाड 2. कामाख्या- नवी दिल्ली एसी एक्स. (साप्ता) मार्गे छपरा, वाराणसी
3. ़मुंबई- हावडा एसी एक्स. (साप्ता) मार्गे नागपूर, रायपूर 4. मुंबई-पाटणा एसी एक्स. (आठवड्यातून 2) मार्गे खंडवा, इटारसी
5. निजामुद्दीन-मडगाव एसी एक्स. (आठवड्यातून 2)मार्गे कोटा 6. सियालदेह-जोधपूर एसी एक्स (आठवड्यातून 2) मार्गे मुगलसराय
7. यशवंतपूर - जयपूर एसी एक्स (साप्ता) मार्गे पुणे, वसई रोड 8. अहमदाबाद-दिल्ली सराय रोहिल्ला एक्स (आठवड्यातून 2)
9. बांद्रा- अमृतसर एक्स. (साप्ता) मार्गे कोटा, नवी दिल्ली, अंबाला 10. 10. बांद्रा (टी)- कटरा एक्स (साप्ताहिक) मार्गे कोटा, नवी दिल्ली
11. गोरखपूर-नवी दिल्ली एक्स.(आठवड्यातून 2) मार्गे लखनौ 12.कटरा- हावडा एक्स. (साप्ता) मार्गे मुगलसराय, वाराणसी
13. मुंबई- गोरखपूर एक्स. (आठवड्यातून 2) मार्गे खंडवा, झाशी 14. 14. पाटणा- बंगळुरू एक्स (साप्ता) मार्गे मुगलसराय, नागपूर
15. यशवंतपूर-कटरा एक्स (साप्ता)मार्गे नागपूर, नवी दिल्ली 16. तिरुअनंतपूर-बंगळुरू (यशवंतपूर) एक्स (आठवड्यातून 2)
17. कामाख्या-चेन्नई एसी एक्स (साप्ता) मार्गे मालदा, हावडा

नवीन 39 एक्स्प्रेस
1. अहमदाबाद-कटरा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे पालनपूर, जयपूर, रेवाडी, हिसार, बठिंडा, अमृतसर
2. अहमदाबाद- लखनौ जं. एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे पालनपूर, जयपूर, बांदीकुई, मथुरा, कासगंज
3. अहमदाबाद-अलाहाबाद एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे जळगाव, खंडवा, इटारसी, सतना, माणिकपूर
4. अमृतसर-गोरखपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे सहारणपूर, मुरादाबाद, सीतापूर कँट
5. औरंगाबाद-रेणिपुरा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे परभणी, विकाराबाद
6. बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस (दररोज) मार्गे बंगारपेट, जोलारपेट्ट
7. बांद्रा-लखनऊ एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे कोटा, मथुरा, कासगंज
8. बरेली-भोपाळ एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे चंदौसी, टुंडला, आग्रा
9. भावनगर-बांद्रा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे अहमदाबाद
10. भावनगर-दिल्ली सराय रोहिल्ला लिंक एक्स्प्रेस (साप्ताहिक)
11. गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
12. गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे लखनऊ, बीना, मनमाड
13. गुटूंर-काचिगुडा डबल डेकर एक्स्प्रेस (आठवड्यातून दोन दिवस)
14. हावडा-यशवंतपूर एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे भुवनेश्वर, गुडूर
15. हुबळी-मुंबई एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे विजापूर, सोलापूर
16. हैदराबाद-गुलबर्गा इंटरसिटी (दररोज)
17. जयपूर-चंदिगड इंटरसिटी (दररोज) मार्गे झज्जर
18. काचिगुडा-तिरुपती डबल डेकर एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा)
19. कोटा-जम्मूतावी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे नवी दिल्ली, अंबाला
20. कानपूर-बांद्रा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे कासगंज, मथुरा, कोटा
21. लखनऊ- काठगोदाम एक्स्प्रेस (आठवड्यातून तीन दिवस)
22. मंडुआडीह- जबलपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे अलाहाबाद, सतना
23. मालदा टाउन-आनंद विहार एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे अमेठी
24. मन्नारगुडी-जोधपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे जयपूर
25. मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे पुणे, गुलबर्गा, वाडी
26. मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे गोंडा, बलरामपूर, बरहनी (गेज बदलल्यानंतर)
27. मुंबई-करमाली एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे रोहा
28. नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे पूर्णा, परभणी
29. नागपूर-रीवा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे सतना
30. नगरकोईल-काचिगुडा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे करूर, नामक्कल, सेलम
31. पुणे-लखनऊ एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे खंडवा, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर
32. रामनगर-चंदिगड एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे मुरादाबाद, सहारणपूर
33. रांची-न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे झाझा, कटिहार
34. सिकंदराबाद-विशाखापट्टणम् एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे काजीपेट, विजयवाडा
35. संतरागाछी- आनंद विहार एक्स्प्रेस (साप्ताहिक)
36. र्शी गंगासागर-जम्मूतावी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे अबोहर, बठिंडा
37. तिरुअनंतपुरम-निझामुद्दीन एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा) एक दिवस मार्गे कोट्टायम व एक दिवस मार्गे एलेप्पी
38. वाराणसी-मैसूर एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा) मार्गे वाडी, दौड
39. बालुरघाट-हावडा (आठवड्यातून दोन दिवस)

रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी रेल्वेने राज्यांबरोबर भागीदारीची योजना बनवली आहे; पण त्यासाठी केवळ काँग्रेसशीसत राज्यांचीच निवड करण्यात आली. कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हरियाणाच्या राज्य सरकारांनी भागीदारीसाठी होकार दर्शवल्याचे सांगण्यात आले.

उधमपूर-कटरा मार्गावर काम पूर्ण झाले आहे. ट्रायल सेवाही सुरू आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये बनिहालपासून काजीगुंडदरम्यान बोगद्याद्वारे 11.2 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला. यामुळे 35 किलोमीटरचे अंतर 15.5 किलोमीटरवर आले आहे.