आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रेल्वे भांडवल बाजारात, आयआरएफसीचे करमुक्त रोखे येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आयआरएफसी सहा जानेवारीला भांडवल बाजारात प्रवेश करीतआहे. करमुक्त रोख्यांच्या विक्रीतून 8,660 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
हे करमुक्त आणि सुरक्षित बिगर परिवर्तनीय रोखे जवळपास 8,663 कोटी रुपयांचे असून ही विक्री 20 जानेवारीला बंद होत असल्याचे आयआरएफसीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. या रोखे विक्रीतून मिळालेल्या निधीचा उपयोग रोलिंग स्टॉक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने वित्तपुरवठा करण्यासाठी होणार असून तो विद्यमान व्यवसाय कामकाज पद्धतीनुसार रेल्वे मंत्रालयाला भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. आयआरएफसी ही रेल्वे मंत्रालयाची वित्तीय शाखा आहे. भारतीय रेल्वेच्या नियोजित योजनांना वित्त पुरवठा करण्याच्या उद्देशानेदेखील ही रोखे विक्री करण्यात येत आहे.