नवी दिल्ली- केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात 14.2 टक्क्यांनी तर मालवाहू दरांत 6.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.
रेल्वेमंत्री सदानंदा गौडा यांनी रेल्वेची दरवाढ होणार असल्याचे गुरुवारी संकेत दिले होते. त्यामुळे प्रवाशी भाड्यातील आणि मालवाहू दरांतील वाढ होणार हे जवळपास निश्चित होते. यावेळी बोलताना गौडा म्हणाले होते, की रेल्वेच्या भाडेवाढीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
पुढील महिन्यात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यापूर्वी रेल्वेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली होती. रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून तब्बल 29,000 कोटी रुपये देण्यात आले होते. तरीही आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
पुढील स्लाईडवर वाचा, राष्ट्रीय ट्रान्सपोटर्स करताहेत भाडेवाढीचा विचार...