आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway Website Updation And Got New Facilities

भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी नव्या सुविधा; एकाच लिंकवर मिळेल संपूर्ण मा‍हिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असून भारतीय रेल्वेचे गर्दीचे सिझन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांना विविध सुविधा देण्याची रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी नव्या सुविधा सुरु केली आहे. रेल्वे रिझर्व्हेशन असो वा रेल्वे गाड्यांची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या विविध वेबसाईटला भेट द्यावी लागत होती. मात्र, आता प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने 'www.indiarail.gov.in' ही वेबसाइट नव्या रुपात लॉन्च केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना एकाच लिंकवर संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे वेबसाइटची गती वाढविण्यासाठी स्वतंत्र सर्व्हरही बसविण्यात आला आहे. त्यामुळे आता गर्दीच्या सिझनमध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाची सहयोगी संस्था सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमतर्फे (क्रिस) सध्या वेबसाइटच्या अपडेशनचे काम सुरु आहे. होम पेजही आकर्षक डिझाइनमध्ये तयार करण्‍यात आले आहे. व्हिजिटर्सला सगळ्या गोष्टी एकाच लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वेबसाइटवर सुरु असलेल्या जाहिरातींचेही व्यवस्थीत नियोजन करण्‍यात आले आहे.

पुढे वाचा, रेल्वेच्या नव्या वेबसाइटचा कसा कराल वापर...