आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाला तरतरी, डॉलरच्या तुलनेत सहा पैशांची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निर्यातदारांकडून चांगली मागणी आल्याचा फायदा शुक्रवारी रुपयाला झाला. त्यातच शेअर बाजारात तेजी आल्याने रुपयाला बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत रूपयाने सहा पैशांची कमाई करत 60.08 पातळीपर्यंत मजल मारली.

फॉरेक्स डिलर्सनी सांगितले, जागतिक स्तरावर डॉलर कमकुवत झाल्याचा लाभ रुपयाच्या मूल्याला झाला. व्हेरासिटी समूहाचे सीईओ प्रमित ब्रह्मभट्ट यांनी सांगितले, डॉलर-रुपया व्यवहार मर्यादित कक्षेत होत आहे. अर्थसंकल्प जवळ आल्याने गुंतवणूकदार सतर्कतने पावले टाकत आहेत. सर्वांच्या नजरा आता अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.