आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीबाई उंबरठ्यावर; पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ, महागाई वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकेच्या क्षितिजावर सकारात्मक आर्थिक संकेताची किरणे दिसू लागली आहेत. त्यामुळे जगभरातील प्रमुख देशांच्या चलनाची डोकेदुखी वाढली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रुपयाच्या घसरणीने बुधवारी सर्वकालीन नीचांकी पातळी नोंदवली. डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली. आंतरबँक विदेशी मुद्रा विनियम बाजारात (फॉरेक्स) डॉलरच्या तुलनेत रुपयाने 106 रुपये गमावत 60.72 पातळी नोंदवली. रुपयाच्या सर्वकालीन नीचांकीमुळे मंदीचे ढग भारतीय क्षितिजावर दाट होत आहेत.
फॉरेक्स बाजारात रुपयाची सुरुवात घसरणीने झाली. मंगळवारी रुपया 59.66 पातळीवर बंद झाला होता. डॉलरला आलेल्या प्रचंड मागणीमुळे रुपयातील घसरण सुरूच राहिली. इंट्रा-डे बाजारात रुपयाने 60.76 हा नीचांक नोंदवला. सत्राच्या शेवटी 106 पैशांच्या घटीसह रुपया 60.72 वर स्थिरावला. दोन आठवड्यांपूर्वी 10 जून रोजी रुपया 109 पैशांनी घसरला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत कर्ज रोखे खरेदीत कपात करण्याचे संकेत दिले. त्यामुळे विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी जोखीम असलेल्या शेअर बाजारातून निधी उपसण्यास सुरुवात केली. त्यामुले डॉलरची मागणी वधारली. परिणामी जगातील प्रमुख देशांच्या चलनात घसरण झाली. रुपयाही त्यातून वाचला नाही. डॉलरच्या घोडदौडीमुळे मे महिन्यात रुपयाचे 12 टक्के अवमूल्यन झाले, तर जूनमध्ये आतापर्यंत रुपयाचे मूल्य 7 टक्क्यांनी घटले.
प्रयत्न तोकडे
जून महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयात नीचांकी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत 20 जून रोजी रुपयाने 59.985 हा सर्वकालीन नीचांक नोंदवला. बुधवारी रुपयाने ही पातळी गाठताच सतर्क असलेल्या रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून दोन वेळा डॉलरची विक्री केली. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न तोकडे पडल्याचे फॉरेक्स तज्ज्ञांनी सांगितले.

रुपयाची घसरण, महागाईला निमंत्रण

० आयात महागणार
० डाळ, खाद्यतेल कडाडणार
० पेट्रोल, डिझेल, गॅस भडकणार
० विदेशी शिक्षणाचा खर्च वाढणार
० जीवनावश्यक वस्तू महागणार
० चालू खात्यातील तूट वाढणार

मंदीची चाहूल
रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीमुळे मंदीचे सावट भारतीय अर्थव्यवस्थेवर दाटणार आहे. डॉलर महागल्याने आयात-निर्यात समीकरण बदलून व्यापारी तूट फुगणार आहे. महागाई तसेच चालू खात्यातील वित्तीय तूट फुगल्याने मंदी उंबरठ्यावर असल्याचे मानावे, असे अर्थतज्ज्ञांना वाटते.

कोणासाठी किती रुपये मोजावे लागणार
पाउंड 93.21
येन 62.09
युरो 79.05
डॉलर 60.72