आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोनमध्ये भारतीय कंपन्या दाखवणार स्मार्टनेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बजेटमधला फोन किंवा स्वस्त मोबाइल श्रेणीच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेवर ताबा मिळवल्यानंतर आता भारतीय मोबाइल हँडसेट निर्माते स्मार्टफोनचा जुगार खेळण्याच्या तयारीत आहेत. स्मार्टफोनची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय मोबाइल कंपन्या त्याकडे आकर्षित झाल्या आहेत. या क्षेत्रात अनेक नव्या संधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा लाभ ग्राहकांना चांगले स्मार्टफोन मिळण्याची शक्यता असून ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अनेक प्रमुख भारतीय हँडसेट उत्पादक कंपन्या स्मार्टफोन श्रेणीतील नवनवीन मॉडेल्स बाजारात सादर करण्याची शक्यता आहे.
भारतीय कंपन्या स्मार्टफोनशिवाय आगामी काळात टॅबलेट श्रेणीतील मॉडेलही बाजारात सादर करतील, अशी शक्यता आहे. यासंदर्भात विश्लेषकांचे म्हणणे असे की, आता मल्टिनॅशनल कंपन्यांच्या त्यांच्या हँडसेटसह त्यांची ब्रँड व्हॅल्यूही वाढवत आहेत. परिणामी ग्राहकांना 7000 ते 12,000 रुपयांपर्यंतचे हँडसेट खरेदी करण्यासाठी बड्या कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देत आहे. स्मार्टफोन श्रेणीत मागणी वाढल्याने भारतीय कंपन्यांची सरासरी विक्री मूल्य (अ‍ॅव्हरेज सेलिंग प्राइस) वाढत आहे. त्याचा अनुकुल लाभ नफ्याच्या माध्यमातून कंपन्यांना मिळत आहे.
लावा इंरटनॅशनल लिमिटेडचे संचालक एस. एन. रॉय यांनी सांगितले की, ग्राहक आता महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी देशी कंपन्यांच्या हँडसेटना प्राधान्य देत आहेत. याचे प्रमुख कारण भारतीय हँडसेट कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यूही आता चांगलीच मजबूत झाली आहे. त्यामुळे 7 ते 12 हजाराच्या श्रेणीतील मोबाइलमध्येही अनेक बदल, अ‍ॅप्लिकेशन ग्राहकांना मिळत आहेत. भारतीय ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेऊन कंपन्या ऑगस्ट ते डिसेंबर 2012 या कालावधीत अनेक नवनवीन उत्पादने बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहेत. कार्बन मोबाइलचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी सांगितले की, सध्या स्मार्टफोन श्रेणीत कंपनीच्या उत्पादनांची जोरदार विक्री होत आहे. त्यामुळे उत्साहित होऊन आम्ही आगामी काळात आणखी वेगाने बाजारात उतरणार आहोत. त्यांनी सांगितले की, जून 2012 मध्ये कंपनीने 90 हजार स्मार्टफोन विकले. तर सप्टेंबरपर्यंतच्या कालवधीत 2.5 लाख स्मार्टफोन विकले जातील, असा विश्वास आहे. स्मार्टफोन श्रेणीत विक्री वाढण्यासोबतच सरासरी विक्री मूल्यातही वाढ होत आहे. जून2012 मध्ये सरासरी विक्री मूल्य 3000 रुपयांच्या आसपास होते. त्यात वाढ होऊन मार्च 2013 पर्यंत 3,500 ते 4,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतीय कंपन्या स्मार्टफोनचे अनेक नवे मॉडेल बाजारात सादर करणार.
स्मार्टफोनशिवाय टॅबलेट सेगमेंटमध्ये मोठ्या संधी असल्याने भारतीय कंपन्यांनी त्या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.