आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 12 अंकांनी घसरला तर निफ्टीत किरकोळ घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सार्वकालीन उच्चांकावर पोहोचलेल्या शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात नफेखोरी झाली. भांडवली वस्तू, धातू व वाहन कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या धाेरणात्मक बैठकीमुळे गुंतवणूकदारांनी सतर्कतेचा पवित्रा घेतला. त्यामुळे सेन्सेक्स ११.८६ अंकांनी घसरून २९,७८६.३२ वर आला. निफ्टी ३.८० अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८९१४.३० वर स्थिरावला.
सलग पाच सत्रांत तेजीच्या लाटेवर असणाऱ्या शेअर बाजारात बुधवारी घसरण दिसून आली. ब्रोकर्सनी सांगितले, वायदा सौदापूर्तीच्या सत्रापूर्वी गुंतवणूकदारांत फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या आठ सत्रांत २२०० अंकांची कमाई केल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिला.
ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, रिअॅल्टी आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने घसरत्या बाजाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यातच फेडरल रिझर्व्हचे धोरण जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. जागतिक बाजारातही फारशी वेगळी स्थिती नव्हती. आशियातील तसेच युरोपातील प्रमुख बाजारांत संमिश्र कल दिसून आला. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १७ समभाग चमकले.
टॉप लुझर्स :
भारती एअरटेल, सेसा स्टरलाइट, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टाटा पॉवर, हिंदाल्को, एचडीएफसी बँक, भेल

टॉप गेनर्स : एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एसबीआय, ओएनजीसी, टीसीएस, मारुती.