आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Sugar Industry News In Marathi, HSBC Survey, Divya Marathi

भारताने साखर निर्यात थांबवावी,एचएसबीसी’च्या अहवालाचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दीर्घकाळात साखरेचे उत्पादन हे स्थानिक मागणीच्या बरोबर येण्याची शक्यता असून अन्य देशांच्या तुलनेत उत्पादन खर्च अगोदरच जास्त आहे. त्यामुळे भारताने साखर निर्यात थांबवावी, असे मत ‘एचएसबीसी’च्या सर्वेक्षणात म्हटले आहे.


ब्राझीलमधील साखर उत्पादन खर्च सर्वात कमी म्हणजे प्रतिपौंड 17 डॉलर असून भारतामध्ये हा खर्च जवळपास 40 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांत ब्राझीलच्या साखर निर्यातीमध्ये वाढ झाली असल्याचे एचएसबीसीच्या ‘जागतिक कृषी वस्तू’ या सर्वेक्षणात म्हटले आहे.


साखरेचा देशांतर्गत वापर आणि साखर उत्पादन क्षमता एका समान पातळीवर येण्याचा आमचा दीर्घकालीन अंदाज आहे. त्यामुळे दीर्घकाळात भारताने साखर निर्यात थांबवावी, असे मत या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भारतातील साखर उत्पादन हे जागतिक पातळीवरील साखरेच्या किमती ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरायचे. पण आता तशी स्थिती नसल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक साखर कारखाने नकारात्मक नफ्याची नोंद करीत असून शेतक-यांना देण्यात येणारी थकबाकीदेखील उच्चांकी प्रमाणावर गेली आहे. देशातील साखर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.