आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Tourist Give Preference To South Africa For Tour

भारतीय पर्यटकांची दक्षिण आफ्रिकेला पसंती, डॉलर दुबळा होऊनही दुप्पट वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डॉलरच्या तुलनेत रुपया दुबळा होऊनही भारतातून जाणारे पर्यटक कमी झाले नसून उलट त्यात दुप्पट वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेत यामुळे 550 कोटी रुपये भर पडत असल्‍याची माहिती भारतातील दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागाच्या प्रमुख हनेली श्लाबर यांनी दिली.

जागतिक स्तरावर होणारे पर्यटन 3.4 टक्के आहे तर एकट्या भारतातून येणारे पर्यटक प्रमाण 20 टक्के आहेत. त्या म्हणाल्या, की केवळ पर्यटकांची संख्या नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील रोजगार निर्मितीत भारताचा हिस्सा सर्वाधिक आहे. देशातील 15 शहरात लर्न साउथ आफ्रिका कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. त्यात महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे ही दोन शहरे आहेत. या कार्यक्रमात देशातील पर्यटन संस्थातील कर्मचारी भारतीय पर्यटकांना कोणती उत्पादने आणि सेवा द्यायच्या याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यानिमित्त हनेली श्लाबर पुण्यात आल्या आहेत. नागपुरात हा कार्यक्रम 31 जुलै म्हणजे बुधवारी होणार आहे.

भारतातून मिळणारा प्रतिसाद पाहून यंदा पर्यटकाला मिळणा-या सेवा 14 वरून 100 केल्या जात आहेत. सुमारे पाच लाख पर्यटक यंदा आफ्रिकेत येतील. गेल्या वर्षीपेक्षा त्यात 60 हजाराने वाढ होणार आहे. भारतीय पर्यटक आफ्रिकेत इतरांपेक्षा अधिक दिवस राहतात आणि भरपूर प्रमाणात खर्च करतात

डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ आफ्रिका दौरा करणार असल्याने त्या अनुषंगाने सामने पाहण्यास येणारे लोक वाढतील असा अंदाज आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटीपेक्षा एक दिवसीय सामने अधिक ठेवल्याने चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.