आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांच्या श्रीमंतीची वाढ आशियात अव्वल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्यक्तिगत श्रीमंतांच्या वाढीच्या यादीत भारताने आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जगभरात करोडपती किंवा जास्त संपत्ती धारकांची (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स-एचएनआय) संख्या 1.2 कोटी आहे. यांची एकत्रित संपत्ती 46,200 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी करोडपतींच्या संख्येबाबत भारत दुस-या क्रमांकावर होता. गेल्या वर्षी भारतातील एचएनआयच्या संख्येत 22.2 टक्के वाढ झाल्याचे कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालात म्हटले आहे.


कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटच्या विश्व संपत्ती अहवाल 2013 नुसार जगभरातील करोडपतींच्या गुंतवणूकयोग्य संपत्तीत 10 टक्के वाढ झाली आहे. ही संपत्ती आता 46,200 अब्ज डॉलर झाली आहे. दोन वर्षांपूर्वी 2011 मध्ये एनएचआयच्या एकूण संपत्तीत 1.7 टक्के घट झाली होती. अहवालानुसार गेल्या वर्षभरात जगातील अब्जपती व करोडपतींची लोकसंख्या 10 लाखाने वाढली असून ती आता 1.2 कोटीपर्यंत पोहोचली आहे. अशा रीतीने श्रीमंतांच्या संख्येत 9.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली.


कॅपजेमिनी ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य विक्री व विपणन अधिकारी जीन लासिनगार्डी यांनी सांगितले, गेल्या वर्षभरात (2012) श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षी उत्तर अमेरिकेतील एचएनडब्ल्यूआयची संख्या 37.3 लाखांवर पोहोचली.


आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील श्रीमंतांच्या 36.8 लाखांपेक्षा ती जास्त आहे. उत्तर अमेरिकेतील अतिश्रीमंतांची संपत्ती 12,700 अब्ज डॉलर झाली, तर आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील श्रीमंतांची संपत्ती 12,000 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली.