आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला बँक ‘ब्रँड’ बनण्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील पहिली महिला बँक असलेल्या भारतीय महिला बँकेने नवीन आर्थिक वर्षात 55 ते 60 नवीन शाखा उघडण्याचा संकल्प सोडला आहे.

यंदाच्या 31 मार्चपर्यंत 23 ते 24 शाखा उघडण्यात येणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात देशभरात विविध ठिकाणी आणखी 55 ते 60 शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे बॅँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांनी सांगितले. हैदराबाद येथील 19 व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रिझर्व्ह बॅँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रस्तावित 80 शाखांपैकी 20 शाखा ग्रामीण भागात उघडण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षात नोव्हेंबरमध्ये पहिली शाखा उघडणार्‍या भारतीय महिला बॅँकेला आता एक ब्रँड म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. महिलांच्या सर्व गरजा भागवण्याच्या दृष्टीने या बॅँकेची रचना करण्यात आली असून त्यांना संपूर्ण बॅँकिंग आणि वित्तीय सेवा देण्यात येतात. अगदी बचत गटांपासून ते अत्यल्प, मध्यम कुटुंबातील ते श्रीमंत वर्गातल्या महिलांसाठी विविध प्रकारची उत्पादने देण्यात येतात, असेही अनंतसुब्रमण्यम म्हणाल्या