आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय व-हाड निघाले थायलंडला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशाबाहेर व-हाड नेउन लग्न करण्याचे वेड वाढत चालले असून अशी भारतीय जोडपी थायलंड देशाला सर्वाधिक पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरात १०० जोडपी लग्नासाठी बँकॉकला येउन गेल्याचे थायलंड पर्यटन मंडळाचे प्रमुख एस बुद्धाणी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

राहण्याची व्यवस्था, कागदपत्रे, हॉल आरक्षण याबाबत चौकशी केली जात आहे. आम्ही सर्व सोयी त्यांना पुरवत असून बहुतेक विवाह हिंदू पद्धतीने केले जात आहेत. भारतातील ३० लग्न सोहळा आयोजकांची मदत त्यासाठी घेतली जाते आहे. लोक फुकेत, को चंग अशा ठिकाणी लग्नाला जात आहेत. वधू आणि वराला बक्षीस देता यावी यासाठी आम्ही दोन विमान तिकिटे फुकट देत आहोत, असे ते म्हणाले. भटजी, आचारी याचीही सोय केली जात आहे. अशा लग्नाला येणारे मायदेशी गेल्यावर आपल्या पाल्याच्या लग्नासाठी परत येत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. एका उद्योजकाने थायलंड पर्यटन मंडळाच्या अधिका-यांना मुंबईत बोलावून घेऊन खास पारंपरिक पदार्थ हवेत अशी मागणी करताच त्यातील काही पदार्थ भारतातून नेण्यास आणि काही थायलंडमध्ये बनविण्यासाठी आचार्याची व्यवस्था करण्यात आली असेही त्यांनी सागितले.

भारतातून १३ लाख पर्यटक २०१३ मध्ये थायलंडला भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की, केवळ खरेदीसाठी येणारे पर्यटक ७० टक्के महसूल देशाला मिळवून देतात. बहुतेक लोक टीव्ही स्वस्त असल्याने खरेदी करतात. चित्रीकरण, बायकिंग, वन पर्यटन, क्रीडा पर्यटन यावर आम्ही आगामी काळात अधिक भर देणार आहोत, असेही त्‍यांनी सांगितले.