आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील अव्वल 500 कंपन्यांत महाराष्ट्रातील 205 कंपन्या , औरंगाबाद, जळगावच्या कंपन्यांनाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बई - जागतिक व्यावसायिक माहिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘डन अ‍ॅँड ब्रॅडशीट्स इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या देशातल्या अव्वल 500 कंपन्यांच्या यादीत महाराष्ट्रातल्या 205 कंपन्यांनी मानाचे स्थान पटकावले आहे. या अव्वल कंपन्यांच्या यादीत औरंगाबाद , नाशिक आणि जळगावमधील कंपन्यांनी मान मिळवला आहे.

विश्वासार्हता आणि उच्च कार्यक्षमतासह, एकूण उत्पन्न, निव्वळ नफा अश विविध आर्थिक निकषांवर या कंपन्यांची दखल डन अ‍ॅँड ब्रॅडशीट्सच्या ‘इंडियाज टॉप 500 कंपनीज’ या चौदाव्या आवृत्तीमध्ये घेण्यात आली आहे. यात खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असून त्यांची नोंद शेअर बाजारात करण्यात आली आहे.

‘डी अँड बी’च्या अभ्यासानुसार देशातील अव्वल 500 कंपन्यांमध्ये एकूण 288 कंपन्यांचा समावेश असून एकूण रोजगाराच्या तुलनेत संघटित क्षेत्रात 10 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासदरातील योगदान 20 टक्के असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. देशातील अव्वल 500 कंपन्या एकूण निर्यातीच्या तुलनेत 30 टक्के असून त्यामुळे भारताचा ‘ब्रॅँड’ विकसित करण्यात मोठे योगदान देत आहेत. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवलाच्या आधारे या कंपन्यांची निवड केली जाते. पब्लिकेशनमधील कंपन्यांचे क्षेत्रानुसार वर्गीकरण केले जाते. हे क्षेत्रावर आधारित वर्गीकरण करताना महसूल विचारात घेतला जातो. कोणत्याही कंपनीने किमान 35 टक्के महसूल हा विशिष्ट क्षेत्रातून मिळवायला हवा. तरच तिची त्या क्षेत्रात निवड होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये कंपन्यांचे एकूण उत्पन्नाच्या आधारे मानांकन केले जाते. प्रत्येक क्षेत्रामध्ये एकूण उत्पन्नावर आधारित कंपन्यांचे नामांकन केले जाते. चलनवाढीचा ताण आणि घटलेली मागणी लक्षात घेता अव्वल 500 कंपन्यांनी मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्ष 2014 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये उत्पन्नात
आठ टक्के वाढीची नोंद केली. ते आता सात टक्क्यांवर आले असल्याचे डन ब्रॅड ब्रॅडशीट्सचे सीईओ कौशल संपत यांनी सांगितले.

मानांकित कंपन्या

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स, मॅरिको लिमिटेड, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड.

नाशिक : सीमेन्स, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, ग्लॅक्सोस्मिथ, बॉश, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, सिएट लिमिटेड, लार्सन अ‍ॅँड टुब्रो.

औरंगाबाद : बजाज ऑटो, वोक्हार्ट, कोलगेट पामोलिव्ह, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड, ग्रीव्हज कॉटन लि., सीमेन्स.