आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s First 150cc Automatic Scooter With Metal Body And Multi Culture

भारताची पहिली 150 सीसी ऑटोमॅटिक स्कूटर, मेटल बॉडीसह मल्टी कलरमध्ये \'स्टार यूरो\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहिया मोटर्स लिमिटेड अर्थात 'एलएमएल'ने आपली बहुचर्चित आणि 150 सीसी क्षमता असलेली भारतातील पहिली ऑटोमॅटिक स्कूटर 'स्टार यूरो' लॉन्च केली आहे. यामुळे 'स्कूटर'चा जमाना पुन्हा परतला असल्याचे जाणवत आहे. यावेळी कंपनीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत अत्याधुनिक स्कूटर बाजारात उतरवली आहे.

'स्टार यूरो' स्कूटर मेटल बॉडीसह मल्टी कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सर्वाधिक मायलेजचाही कंपनीने दावा केला आहे. 'एलएमएल'ने या मॉडेलसाठी अन्य कंपन्यांचे आव्हान पेलण्याची तयारी केली आहे. गेल्या वर्षी पियाजियोने 'व्हेस्पा' स्कूटर लॉन्च केली होती. मात्र अन्य स्कूटरच्या तुलनेत त्याची किंमत जास्त आहे. मात्र, 'व्हेस्पा'मध्ये हाय क्वॉलिटी फीचर्स असल्याने देशातील 'प्रीमियम स्कूटर'चा दर्जा त्याला प्राप्त झाला आहे.


'स्टार यूरो'मधील अत्याधुनिक फीचर्स

टॉप स्पीड- 90 किमी/प्रतितास

बॉडी- लांबी 1,760 एमएम x रुंदी 695 एमएम x ऊंची 820 एमएम

फ्यूअल टाकी - 7 लीटर

मायलेज- 55 किमी/लीटर

इंजिन- 150 सीसी, सिंगल सिलेंडर, फोर स्ट्रोक, फोर्स एअर-कूल्ड इंजिन

पॉवर- 9.38hp

मल्टी कलर मेटल बॉडी
भारताचा पहिला अत्याधुनिक स्कूटर मेटल बॉडीसह यूनिक मल्टी कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सप्तरंगात उपलब्ध
मल्टी शेड्ससोबत 'एलएमएल'चा स्टार यूरो सात वेगवेळ्या रंगात उपलब्ध आहे. या स्कूटरची किंमत 54,014 ते 59,422 रुपये (एक्स शोरूम, गुजरात) असेल.

प्रीमियम स्कूटरची रेंज..
एलएमएलची 'स्टार यूरो' 150 सीसी ऑटोमेटिक स्टॅंडर्डची किंमत 54,014 रुपये, 'स्टार यूरो' 150 ऑटोमॅटिक फ्रंट डिस्क ब्रेक मॉडेलची किंमत 57,918 आणि एलएमएल स्टार यूरो 150 ऑटोमेटिक फ्रंट डिस्क ब्रेकसह म‌ल्टी कलर शेड्सची किंमत 59,422 रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'स्टार यूरो' सारख्या अनेक स्कूटर बाजारात येण्याच्या तयारीत..