आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटत्या जीडीपीची चिंता, विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 253 अंकांनी गडगडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या घसरणीमुळे अगोदरच चिंताग्रस्त झालेले असतानाच देशाच्या घसरलेल्या आर्थिक विकास दराने आणि चीनमधील मंदावलेली उत्पादन वाढ या नव्या चिंतांमुळे भांडवल बाजाराला ग्रासून टाकले. त्यातच युरोझोनमधील आर्थिक पेचप्रसंगाची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. या सगळ्या नकारात्मक घडामोडींमुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स साप्ताहिक आधारावर 253 अंकांनी गडगडला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साप्ताहिक आधारावर शुक्रवारी 16,289.82 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. त्यानंतर तो 16,544.38 आणि 15,933.48 अंकांच्या पातळीत झुलल्यानंतर दिवसअखेर 16 हजारच्या पातळीच्या खालीच म्हणजे 15,965.16 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 78.80 अंकांनी घसरून 4841.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या विक्रीच्या मा-यात वाहन, भांडवली वस्तू, रिफायनरी, बॅँका, ग्राहकोपयोगी वस्तू यांना जास्त फटका बसला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे 1.34 टक्के आणि 1.96 टक्क्यांनी घट झाली.
मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत तसेच 2011 - 12 आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासदराने नऊ वर्षांचा नीचांक गाठत तो अगोदरच्या 6.5 टक्क्यांवरून 5.3 टक्क्यांवर आला. या घसरणीचा धसका घेऊन बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. परंतु विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट करतानाच सरकारी खर्च कमी करण्यासाठी काही कटू उपाययोजनाही जाहीर केल्यामुळे बाजारा ला दिलासा मिळाला.
एकीकडे जीडीपीत झालेली घसरण तर दुस-या बाजूला चीनच्या उत्पादन क्षेत्राने अपेक्षेपेक्षा कमी वाढ नोंदवल्याचा तसेच स्पेन आणि आयर्लंडमधील पेचप्रसंगामुळे युरोप शेअर बाजार गडगडला. त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
गुरुवारी डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत संपल्यामुळे या सरलेल्या आठवड्यात बाजारात चढ - उतार दिसून आला.
क्षेत्रीय निर्देशांकांचा आलेख
हे वधारले : माहिती तंत्रज्ञान (0.53 %), तंत्रज्ञान (0.29 %) बहुराष्टÑीय कंपन्या (0.02 %)
टॉप लुझर्स
टाटा मोटर्स, जिंदाल स्टील, स्टर्लाइट इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, टाटा पॉवर, डीएलएफ, टाटा स्टील.
टॉप गेनर्स
टाटा पॉवर, हिंदाल्को, कोल इंडिया, एनटीपीसी
हे घसरले
वाहन (6.05 %), भांडवली वस्तू (3.49 %) ग्राहकोपयोगी वस्तू (2.30 %), तेल आणि वायू (1.97 %) धातू (1.52 %), आरोग्य (1.25 %), स्थावर मालमत्ता (1.24 %)